JOIN US
मराठी बातम्या / बातम्या / मटका किंगचा मर्डर, ऑफिससमोरच गोळ्या झाडून केलं ठार

मटका किंगचा मर्डर, ऑफिससमोरच गोळ्या झाडून केलं ठार

कल्याणच्या स्टेशन परीसरात नीलम गल्लीत मटका किंग उर्फ मुन्ना उर्फ जिग्नेश ठक्कर याच्यावर अज्ञात इसमांनी गोळीबार केल्याची घटना शुक्रवारी रात्री घडली.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

कल्याण, 01 ऑगस्ट : राज्यात कोरोनामुळे लॉकडाऊन सुरू आहे. अशात कल्याणमध्ये स्टेशन परिसरात गोळीबार झाल्याची घटना शुक्रवारी रात्री घडली आहे. यामध्ये एका मटका किंगची हत्या करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कल्याणच्या स्टेशन परीसरात नीलम गल्लीत मटका किंग उर्फ मुन्ना उर्फ जिग्नेश ठक्कर याच्यावर अज्ञात इसमांनी गोळीबार केल्याची घटना शुक्रवारी रात्री घडली. या घटनेची माहिती महात्मा फुले पोलिसांना मिळताच महात्मा फुले पोलीस घटनास्थळी पोहचले. त्यानंतर पोलिसांनी जिग्नेशचे बॉडी फोर्टीज रुग्णालयात पाठवले. फोर्टीज रुग्णालयात डॉक्टराने जिग्नेशला मृत घोषित केलं. जिग्नेश ठक्कर याचे कल्याण, उल्हासनगर आणि ठाणे परिसरात अनेक ठिकाणी मटका आणि रम्मी क्लब असून तो क्रिकेट मॅचवरदेखील सट्टा बाजार करत असल्याची माहिती प्रथमदर्शनी समोर आली आहे. राज्यभर दूध आंदोलनाला आक्रमक सुरुवात, सरकारच्या विरोधात तीव्र घोषणाबाजी घटनेदरम्यान जिग्नेश हा कल्याण स्टेशन परिसरात असलेल्या आपल्या परिसरात बसला होता. आपल्या कार्यालयातून घरी जाण्यासाठी रात्री जिग्नेश कार्यालयाच्या बाहेर आला. त्याचवेळी घात लावून बसलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी जिग्नेश ठक्करवर गोळ्या झाडल्या. त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला. गोळीबार करून हल्लेखोर हे फरार झाले. घटनेची माहिती मिळताच महात्मा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत याप्रकरणी अज्ञातांच्या विरोधात गुन्हा दाखल करत विविध टीम तयार करून आरोपीच्या शोधत रवाना केल्या असून या हल्ल्यादरम्यान एकूण 2 किंवा 2 पेक्षा अधिक हल्लेखोर असल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. ‘5 चुकांमुळे मला UPSCमध्ये 4 वेळा अपयश आलं’, IPS अक्षत कौशल यांची कहाणी पोलिसांनी जिग्नेशचा मृतदेह ताब्यात घेतला असून तो शवविच्छेदनासाठी नजिकच्या स्थानिक रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. तर आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलीस परिसरात चौकशी करणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. मिळालेल्या अधिक माहितीनुसार, आरोपींच्या मुसक्या आवळण्यासाठी परिसरातले सीसीटीव्ही तपासले जाणार असल्याचंही सांगण्यात येत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या