नवी दिल्ली, 23 मे : कोरोनाची भीती आणि लॉकडाऊनमध्ये काम गेल्यानं उपासमारी यामुळे अनेक परप्रांतीय मजूर आपल्या मूळ गावी परतत आहेत. गेल्या काही दिवसांपासून घरी जाण्यासाठी सुरू असलेली केविलवाणी धडपड दाखवणारे फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. असाच एक फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला. ज्यामध्ये 15 वर्षांची मुलगी आपल्या वडिलांना सायकलवरून (cycle) घरी घेऊन जात होती. या मुलीचं भारतात तर कौतुक झालंच मात्र अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची लेक इवांका ट्रम्पनंही (ivanka trump) या लेकीचं कौतुक केलं आहे. ज्योती कुमारी (jyoti kumari) असं या मुलीचं नाव आहे. आपल्या जखमी वडिलांना डबलसीट घेऊन गुरुग्राम ते बिहार असा तब्बल 1200 किलोमीटरचा प्रवास सायकलवरून या मुलीनं पूर्ण केला. ही बातमी सोशल मीडियावर वाऱ्यासारखी पसरली. ती पाहताच इवांका ट्रम्पनं ट्विट केलं. हे वाचा - आता माणसांमुळे मुक्या जीवांचा जीव धोक्यात; पाळीव कुत्र्यांनाही कोरोनाची लागण इवांका म्हणाली, “15 वर्षीय ज्योती कुमारीनं आपल्या जखमी वडिलांना साकलवर बसवून 7 दिवसांत 1200 किमी प्रवास करून आपलं मूळ गाव गाठलं. सहनशक्ती आणि प्रेमाच्या या वीरगाथेनं भारतीय लोकं आणि सायकलिंग फेडरेशनचंही लक्ष वेधून घेतलं आहे”
इवांकाच्या या ट्विटवर जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला (omar abdulla) मात्र संतापले, त्यांनी इवांकाच्या या ट्विटवर प्रतिक्रिया दिली आहे. ओमर अब्दुला म्हणाले, “ज्योतीने 1200 किमी सायकल चालवून जणू तिला एखादा आनंदच मिळाला किंवा तिनं एखादं थराराक कृत्यं केल्यासारखंच दाखवलं जातं आहे. खरं तर सरकारनं तिला अपयशी केलं आहे”
ज्योती इयत्ता सातवी शिकते. तिचे वडील गुरुग्राम इथे ई-रिक्षा चालवायचे. लॉकडाऊनमुळे धंदा बंद झाला आणि ई-रिक्षा मालकाकडे जमा करावी लागली. तर पैसे संपल्यानं घर मालकानंही घर खाली करण्यासाठी दबाव आणल्यानं त्यांच्याकडे राहण्यासाठी छप्पर आणि खाण्यासाठी पैसे नव्हते. हे वाचा - कोपरापासून दंडवत! PHOTO व्हायरल झाल्यानंतर संजय राऊतांनी केला खुलासा शेवटी एका ट्रक चालकाकडून काही पैसे उधार घेऊन त्यांनी सायकल खरेदी केली. 500 रुपयांमध्ये त्यांनी सायकल खरेदी करून घरी जाण्याचा निर्णय घेतला. प्रवासादरम्यान मागून कोणतेही वाहन धडकणार नाही ना याची सतत भीती वाटत राहायची. जखमी वडील आणि मुलीने 10 मे रोजी गुरुग्राममधून सायकलनं प्रवास सुरू केला. 16 मे रोजी ते दोघंही सुखरुप त्यांच्या घरी पोहोचले.