आता माणसांमुळे मुक्या जीवांचा जीव धोक्यात; पाळीव कुत्र्यांनाही कोरोनाव्हायरसची लागण

आता माणसांमुळे मुक्या जीवांचा जीव धोक्यात; पाळीव कुत्र्यांनाही कोरोनाव्हायरसची लागण

कुत्र्यांमधील व्हायरसचा जिनोम सिक्वेन्स मानवी शरीरातील व्हायरसच्या जिनोम सिक्वेन्सप्रमाणेच आहे.

  • Share this:

हाँगकाँग, 23 मे : कोरोनाव्हायरस (coronavirus) एखाद्या प्राण्यामार्फत विशेषत: वटवाघळामार्फत माणसांमध्ये आल्याची शक्यता वर्तवली जाते आहे. त्यानंतर माणसांकडून माणसांमध्ये हा व्हायरस झपाट्यानं पसरला. आता तर माणसांमार्फत प्राण्यांमध्येदेखील हा व्हायरस पसरू लागला आहे. हाँगकाँगमध्ये (hongkong) 2 कुत्र्यांना (dogs) कोरोनाव्हायरसची लागण झाली आहे आणि हा व्हायरस माणसांमार्फतच त्यांच्यामध्ये आला असा दावा शास्त्रज्ञांनी केला आहे.

नेचर जर्नलमध्ये हे संशोधन प्रकाशित करण्यात आलं आहे.

संशोधकांनी हाँगकाँगमधील कोरोना रुग्णांच्या घरातील 15 कुत्र्यांची चाचणी केली. त्यापैकी 2 कुत्र्यांना कोरोनाव्हायरस असल्याचं निदान झालं. त्यापैकी एक हा पोमेरेनियन जातीचा आहे, तर दुसरा जर्मन शेफर्ड जातीचा आहे. या दोन्ही कुत्र्यांमधील व्हायरसचा जिनोम सिक्वेन्स मानवी शरीरातील व्हायरसच्या जिनोम सिक्वेन्सप्रमाणेच आहे. याचा अर्थ माणसांमार्फत या कुत्र्यांमध्ये व्हायरस आला, असं शास्त्रज्ञांनी म्हटलं आहे. शिवाय या कुत्र्यांमध्ये कोरोनाव्हायरसची कोणतीही लक्षणं नाहीत. त्यांच्यामध्ये कोरोनाव्हायरसविरोधातील अँटिबॉडीजही तयार झाल्यात.

हे वाचा - या टेस्टनं फक्त 20 मिनिटांत रिझल्ट येणार; ऑन द स्पॉट कोरोना रुग्णाचं निदान होणार

माणसांमार्फत प्राण्यांमध्ये कोरोनाव्हायरस पसरण्याचं हे प्रकरण आहे. मात्र संक्रमित प्राणी विशेषत: कुत्र्यांमार्फत इतर प्राण्यांमध्ये हा व्हायरस पसरतो का किंवा कुत्र्यांमार्फत पुन्हा माणसांमध्ये हा व्हायरस येतो का? हे अद्याप अस्पष्ट आहे.

वाघिणीलाही कोरोनाव्हायरसची लागण

एप्रिलमध्ये एका वाघिणीलाही कोरोनाव्हायरसची लागण झाल्याचं निदान झालं होतं. न्यूयॉर्कच्या ब्रॉन्क्स प्राणीसंग्रहालयात वाघिण कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने खळबळ माजली.

हे वाचा - पहिलं कोरोना वॅक्सिन ज्याचं 100 रुग्णांवर झालं ट्रायल, वाचा काय आला रिझल्ट

ब्रॉन्क्स प्राणीसंग्रहालयाच्या वाइल्डलाइफ कन्झर्वेशन सोसायटीच्या मते, कोरोना प्राणीसंग्रहालयातील एका कर्मचाऱ्यामुळे 4 वर्षाच्या या वाघिणीला कोरोनाची लागण झाली. या कर्मचा-याला आधीपासूनच कोरोनाचा संसर्ग झाला असेल आणि वाघही त्याच्या संपर्कात आल्यानंतर कोरोना झाला.

First published: May 23, 2020, 4:21 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading