JOIN US
मराठी बातम्या / बातम्या / मुंबईत महिलेला तब्बल 11 लाखांना लुटले, पद्धत पाहून पोलीसही गेले चक्रावून!

मुंबईत महिलेला तब्बल 11 लाखांना लुटले, पद्धत पाहून पोलीसही गेले चक्रावून!

मार्क डेनिलसन नावाच्या व्यक्तीची फ्रेंड रिक्वेस्ट आली. तिने ती स्वीकारली, त्यानंतर दोघांमध्ये ऑनलाइन चॅटिंग सुरू झाली.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 21 जुलै : फेसबुकवर फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारणे बोरिवलीतील एका महिलेला चांगलेच महागात पडले आहे. कस्टम अर्थात सीमाशुल्क विभागातून वस्तूची सोडवणूक करण्यासाठी या महिलेला तब्बल 11 लाख रुपयांना गंडवल्याचं समोर आलं आहे. या महिलेनं पोलिसात तक्रार दाखल केली आहे. टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, बोरिवली येथील एका 43 वर्षीय महिलेला 22 जुलै रोजी अचानक मार्क डेनिलसन नावाच्या व्यक्तीची फ्रेंड रिक्वेस्ट आली. तिने ती स्वीकारली, त्यानंतर दोघांमध्ये ऑनलाइन चॅटिंग सुरू झाली. या महिलेनं आपल्याला चांगलं इंग्रजी येत नाही असंही सांगितलं. पण, त्याने याची काही अडचण नाही म्हणून संवाद सुरू केला. काही दिवसांनी त्याने आपला नंबर देऊन ही चर्चा व्हॉट्सअॅपवर पोहोचली. या महिलेनेही त्याच्यावर विश्वास टाकला. उस्मानाबादच्या ‘सनी देओल’चं पुढे काय झालं? पोलीस पोहोचले कच्छला, पण… त्यानंतर डेनिलसनने या महिलेला आपलं लग्न करण्यासाठी भारत येणार आहे. त्यासाठी त्याने एक पार्सल भारतात पाठवले आहे, पण कस्टममध्ये अडकले आहे. अत्यंत मौल्यवान असे हे साहित्य आहे. त्याने या महिलेला कस्टमधून हे साहित्य सोडवण्यास विनंती केली. या महिलेनं डेलिलसनचे साहित्य सोडवण्यास होकार दिला. त्यानंतर सुनिता शर्मा नावाच्या महिलेनं आपण दिल्लीत कस्टम अधिकारी असल्याचं सांगून फोन केला. या सुनिता शर्मानं सुरुवातील 15 हजार रुपये भरण्यास सांगितले होते. 15 हजाराची रक्कम या महिलेनं भरून टाकली. त्यानंतर या महिलेकडून वारंवार फोन येण्यास सुरुवात झाली. या महिलेनं नंतर 75 हजार रुपये विदेश चलन भारतीय चलनात बदलण्यासाठी भरण्यास सांगितले.  त्यानंतर मागणी वाढतच गेली. विमानाच्या लँडिंग चार्जेसाठी तिने तब्बल 2.2 लाख आणि 3.5 लाख कर म्हणून भरण्यास सांगितले. जेव्हा या महिलेनं ही रक्कम भरण्यास नकार दिला, तेव्हा सुनिता शर्माने तिच्या विरोधात पोलीस तक्रार करण्याची धमकी दिली. ठाकरे सरकारला पाडण्याचा दिवस ठरला, भाजपने आखला मोठा प्लॅन? 13 जून रोजी ही महिलेनं 2.5 लाख बँकेत भरले सुद्धा परंतु, पार्सल नेमके कुठे आहे, याबद्दल कोणतीही माहिती समोर न आल्यामुळे तिचा संशय बळावला. त्यानंतर तिने थेट पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली आणि तक्रार दाखल केली. पोलिसांत तक्रार दाखल केल्यानंतर तपासाची चक्र फिरवली. या महिलेच्या मुलानेही या डेनिलसन आणि सुनिता शर्मा नावाच्या महिलेचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. डेनिलसनच्या नावाने तब्बल 34 फेक फेसबुक अकाउंट असल्याचे समोर आले. एवढंच नाहीतर देशभरात वेगवेगळ्या ठिकाणी बँकेचे खाते उघडून ही रक्कम वळवण्यात आली होती. कोल्हापूर, दिल्ली आणि आसाममध्ये या भामट्याने पैसे काढले असल्याचं बँक तपासात उघड झालं आहे. कोरोनामुळे अख्खं कुटुंब उद्धवस्त, आईनंतर 5 ही मुलांचा मृत्यू या भामट्या डेनिलसनने अनेक फेसबुक फेक अकाउंट उघडली आहे. यात त्याने रशियातील एका गायकाचा फोटो वापरला आहे. या महिलेच्या मुलाने या रशियातील गायकाला फेसबुकवर तुझ्या फोटोचा गैरवापर झाल्याची माहिती दिली. ही गँग श्रीमंत, नोकरी करणाऱ्या विवाहीत महिलांना हेरून त्यांच्याशी मैत्री करुन नंतर फसवणूक करणे, अशी त्यांची मोड्स ऑपरेटिंग सिस्टिम असल्याचे तपासात समोर आले.  या पाठीमागे मोठे रॅकेट असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या