मराठी बातम्या /बातम्या /देश /

कोरोनामुळे 15 दिवसात अख्खं कुटुंब झालं उद्धवस्त, आईच्या पार्थिवाला खांदा देणाऱ्या 5 ही मुलांचा मृत्यू

कोरोनामुळे 15 दिवसात अख्खं कुटुंब झालं उद्धवस्त, आईच्या पार्थिवाला खांदा देणाऱ्या 5 ही मुलांचा मृत्यू

आईच्या मृत्यूनंतर एक-एक करून पाचही मुलांचा मृत्यू झाला. तर, सहाव्या मुलाची प्रकृती गंभीर आहे.

आईच्या मृत्यूनंतर एक-एक करून पाचही मुलांचा मृत्यू झाला. तर, सहाव्या मुलाची प्रकृती गंभीर आहे.

आईच्या मृत्यूनंतर एक-एक करून पाचही मुलांचा मृत्यू झाला. तर, सहाव्या मुलाची प्रकृती गंभीर आहे.

  • Published by:  Priyanka Gawde

धनबाद, 21 जुलै : झारखंडमधील धनबादमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कोरोनामुळे येथील एक अख्खं कुटुंब उद्धवस्त झाल्याची घटना घडली आहे. कोरोनामुळे एकाच घरातील 6 जणांचा मृत्यू झाला, तर सातव्याची प्रकृती गंभीर आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कोरोनाबाधित आईच्या पार्थिवाला खांदा दिलेले त्यांची सर्व मुलं कोरोना पॉझिटिव्ह आढळून आली. आईच्या मृत्यूनंतर एक-एक करून पाचही मुलांचा मृत्यू झाला. तर, सहाव्या मुलाची प्रकृती गंभीर आहे. धनबादमध्ये आतापर्यंत 8 जणांचा मृत्यू झाला आहे, यातील 6 एकाच कुटुंबातील आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कोरोनाची लागण झालेल्या या कुटुंबातील सहा जणांचा गेल्या 15 दिवसात मृत्यू झाला आहे. असे म्हटले जात आहे की, भारतातील अशी ही पहिली घटना आहे, ज्यात कोरोनामुळे एकाच कुटुंबातील 6 जणांचा मृत्यू झाला आणि कुटुंबातील इतर सदस्यही आजारी आहेत.

वाचा-देशातील मृतांचा आकडा 28 हजार पार, 24 तासांत नवीन रुग्णांची संख्या झाली कमी

4 जुलै रोजी झाले आईचे निधन

ही दुर्देवी घटना धनबादच्या कात्रस भागात घडली. येथील रांची बाजारात राहणाऱ्या एका 88 वर्षीय महिलेचा 4 जुलै रोजी मृत्यू झाला. मृत्यूनंतर कोरोना चाचणी करण्यात आली, त्यात ही महिला कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले. त्यानंतर, त्यांच्या एका मुलाचा बीसीसीएलच्या सेंट्रल हॉस्पिटल कोव्हिड-सेंटरमध्ये मृत्यू झाला, तर दुसर्‍या मुलाचा मृत्यू पीएमसीएचमध्ये झाला. यानंतर, एका मागून एक तब्बल 3 मुलांचा मृत्यू झाला. असे सांगितले जात आहे की, गेल्या महिन्यात जूनमध्ये ही महिला एका लग्न समारंभात सामिल झाली होती. यासाठी दिल्लीहून कात्रस येथील तिच्या घरी आली होती. त्यानंतर त्यांची प्रकृती खालावली.

वाचा-N-95 मास्कचा वापर करत आहात तर सावधान! सरकारने दिला न वापरण्याचा इशारा

देशातील मृतांचा आकडा 28 हजार पार

देशातील कोरोनाबाधितांची (Coronavirus)संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. देशातील एकूण रुग्णांची संख्या आता 11 लाख 55 हजारहून अधिक झाली आहे. दिवसागणिक 35-40 हजार नवीन रुग्ण सापडताना दिसत आहेत. गेल्या 24 तासांतही 37 हजार 140 नवीन रुग्ण सापडले.याआधी सोमवारी तब्बल 40 हजार नवीन रुग्ण सापडले होते, त्यामुळे रुग्णांची संख्या काही अंशी कमी झाल्याचे दिसत आहे. तर, 24 तासांत 587 रुग्णांचा मृत्यू झाला, यासह देशातील एकूण मृतांचा आकडा 28 हजार पार झाला आहे.

वाचा-संतापजनक! पुण्यात एका चुकीमुळे 4 जणांना गमवावा लागला जीव

First published:

Tags: Corona