आशीष मिश्र हरदोई (उत्तर प्रदेश), 06 फेब्रुवारी : उत्तर प्रदेशच्या हरदोईमध्ये एक धक्कादायक प्रकार घडला. एका प्रेयसीने लग्न मोडल्याच्या नैराश्यातून आपल्या प्रियकराच्या घरातच पेट्रोल ओतून स्वत: ला पेटवून घेतले. मुलीची ओरड ऐकून लोकांना आग विझविली, मात्र मुलगी गंभीर अवस्थेत होती. तिला लखनऊ येथील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारा दरम्यानच या महिलेचा मृत्यू झाला. असे सांगितले जात आहे की, या महिलेचे तिच्या प्रियकरासोबत एका वर्षांपूर्वी लग्न निश्चित झाले होते, परंतु नंतर काही कारणास्तव हे लग्न मोडले. मुलगी हे सहन करू शकली नाही आणि लग्न न झाल्याने तिने स्वत: ला पेटवून घेतले. दरम्यान मुलीच्या घरच्यांनी अद्याप पोलिसात तक्रार दाखल केलेली नाही. वाचा- कोरोनामुळे वाचली मुलीची इज्जत, बलात्कारासाठी रूममध्ये घुसला तरुण आणि… वाचा- भव्य आणि दिव्य राम मंदिराच्या निर्मितीसाठी मोदी सरकाने दिली ‘1 रुपया’ देणगी मिळालेल्या माहितीनुसार, जिल्ह्यातील कोतवाली कचौना पोलिस स्थानक परिसरातील मन्ना पुर्वा येथे राहणारी 23 वर्षीय रीटा वर्मा याने संशयास्पद स्थितीत पेट्रोल टाकून स्वत: ला जाळले. रीताला पाहून गावात खळबळ उडाली. ही बाब तातडीने स्थानिक पोलिसांना आणि रुग्णवाहिकांना कळविण्यात आली. पोलिसांच्या मदतीने मुलीला गंभीर अवस्थेत उपचारासाठी सामुदायिक आरोग्य केंद्रात दाखल केले. तिची प्रकृती चिंताजनक झाल्यावर डॉक्टरांनी त्यांना लखनऊला रेफर केले. लखनऊला जात असताना तिचा मृत्यू झाला. वाचा- गॅस गिझर झाला मुत्यूचा सापळा, पुण्यात तरुणाचा मृत्यू वाचा- चीनमुळे जगभरात पसरला कोरोनाव्हायरस, 30 तासांचे नवजात बाळ गर्भातच झाले रुग्ण पोलिसांचा तपास सुरू असे सांगितले जात आहे की वर्षभरापूर्वी शिक्षक राजेंद्र कुमार यांचा मुलगा प्रशांत याने एका अल्पवयीन मुलीशी लग्न ठरवले होते. दोघांमध्ये प्रेमसंबंध होते पण काही कारणास्तव त्यांचे विवाह होऊ शकला नाही. संबंध तुटल्यामुळे ही महिला नैराश्यात होती. त्यामुळं तिने स्वत: ला पेटवून घेतले. सध्या या प्रकरणाचा तपास सुरू आहे.