JOIN US
मराठी बातम्या / बातम्या / तृतीयपंथीयांनी दिला मदतीचा हात, सोनं तारण ठेवून 1000 कुटुंबीयांना दिलं धान्य

तृतीयपंथीयांनी दिला मदतीचा हात, सोनं तारण ठेवून 1000 कुटुंबीयांना दिलं धान्य

बऱ्याच वर्षांपासून साठवलेल्या पुंजीतून त्यांनी स्वत:साठी सोन्याचा हार केला होता. हा सोन्याचा दागिना त्यांनी गहाण ठेवून त्या पैशांमधून गरजूंना मदत केली.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 06 मे : कोरोनामुळे देशभरात 17 मेपर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे. या लॉकडाऊनमुळे हातावर पोट असणाऱ्या मजुरांना मात्र मोठ्या समस्यांचा सामना करावा लागत आहे. पंतप्रधान मोदींच्या फंडमधून किंवा अनेक सामाजिक संस्थांनीही काही मजुरांना मदतीच्या हात दिला आहे. मात्र तरीही काही जण अद्यापही यापासून वंचित आहेत. या महासंकटांत गरजवंताना आता तृतीयपंथीयांना मदतीचा हात पुढे केला आहे. आपल्या जवळील सोन्याचे दागिने गहाण ठेवून त्यांनी 1000 कुटुंबांना धान्य देऊन मदत केली आहे. नूरी कंवर यांच्या पुढाकारातून त्यांनी गरजू, गोरगरिब आणि कामगारांना मदत केली आहे. त्यांच्या या कामाचं सोशल मीडियावर तुफान कौतुक होत आहे. रेल्वे गाड्या आणि इतर कामं बंद असल्यामुळे तृतीयपंथीयांचेही जेवणाचे हाल होत आहेत. गुजराच्या बडोदा इथे राहात असलेल्या तृतीयपंथीय समुदायानं तृतीयपंथीय सदस्यांना मदत केली आहे. लॉकडाऊनच्या पहिल्या टप्प्यात तांदळपासून मसाल्यांपर्यंतच्या अनेक गोष्टी त्यांनी जवळपास 700 कुटुंबीयांना दिल्या. तर आताही आपल्या परिनं मदत करण्याचं काम सुरू आहे.

हे वाचा- खिसे रिकामेच अन् भविष्य अधांतरी; लॉकडाऊनमध्ये उपाशीपोटी मजूर परतले आपल्या घरी बऱ्याच वर्षांपासून साठवलेल्या पुंजीतून त्यांनी स्वत:साठी सोन्याचा हार केला होता. हा सोन्याचा दागिना त्यांनी गहाण ठेवून त्या पैशांमधून गरजूंना मदत केली. नूर कंवर यांनी आपल्या बहिणीचा नंबरही अनेक झोपडपट्ट्या आणि गरजू लोकांना मदतीसाठी दिला आहे. पास आणि परवाने घेऊन तृतीयपंथीयांनी घरापर्यंत धान्य पोहोचवलं आहे. सोशल डिस्टन्सचं पालन आणि लॉकडाऊनच्या नियमाचं पालन करून हे धान्य वाटप केलं आहे. त्यांच्या या कामाचं सोशल मीडियावर खूप कौतुक होत आहे. हे वाचा- कोरोनाचा आपोआपच नाश होणार? शास्त्रज्ञांना दिसून आला व्हायरसमध्ये विशेष बदल हे वाचा- नागपुरात संघर्ष थांबेना, सत्ताधाऱ्यांनी आयुक्त तुकाराम मुंढेंनाच दिला असा दणका!

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या