Home /News /coronavirus-latest-news /

कोरोनाचा आपोआपच नाश होणार? शास्त्रज्ञांना दिसून आला व्हायरसमध्ये विशेष बदल

कोरोनाचा आपोआपच नाश होणार? शास्त्रज्ञांना दिसून आला व्हायरसमध्ये विशेष बदल

अमेरिकेतल्या शास्त्रज्ञांना पहिल्यांदाच कोरोनाव्हायरसचं एक विशेष प्रकारचं म्युटेशन (Coronavirus mutation) पाहायला मिळालं.

    वॉशिंग्टन, 06 मे : संपूर्ण जगात थैमान घालणारा कोरोनाव्हायरसचा (Coronavirus) नाश कधी होणार, याची प्रतीक्षा प्रत्येकालाच आहे. कदाचित लवकरच कोरोनाव्हायरसचा नाश होण्याची शक्यता आहे. कारण कोरोनाव्हायरसमध्ये शास्त्रज्ञांना असे बदल दिसून आलेत, ज्यामुळे तो कमजोर पडत आहे. डेली मेलच्या रिपोर्टनुसार , कोरोनाव्हायरसमध्ये अमेरिकेतल्या शास्त्रज्ञांना कोरोनाव्हायरसमध्ये बदल पाहायला मिळाला आहे, त्यातून माणसांमध्ये व्हायरसचं संक्रमण कमजोर पडत असल्याचे संकेत मिळत आहेत. हे वाचा - काय म्हणताय! आता 'हा' प्राणी माणसांंना Coronavirus पासून वाचवणार? यूएसमधील एरिजोना स्टेट युनिव्हर्सिटीच्या (Arizona State University) शास्त्रज्ञांनी काही कोरोना रुग्णाच्या शरीरातील व्हायरसचे सॅम्पल घेतले. त्यावेळी त्यांना दिसून आलं की एरिजोनातील एका कोरोना रुग्णाच्या शरीरातील व्हायरसमध्ये बदल झाला आहे. या व्हायरसच्या जेनेटिक मटेरियलचा एक भाग गायब असल्याचं त्यांना आढळलं. 2003 सालीदेखील सार्सचा उद्रेक झाला होता तेव्हा व्हायरसमध्ये असाच बदल दिसून आला होता. त्या व्हायरसचंही जेनेटिक मटेरियल गायब झालं होतं आणि त्यानंतर सार्सची प्रकरणं कमी झाली. हळूहळू सार्स महासाथीचा नाश होऊ लागला होता. हे वाचा - फळं आणि भाजी खरेदीला जाताय, काळजी घ्या...नाहीतर घरी कोरोनालाही आणाल एरिजोना स्टेट युनिव्हर्सिटीच्या शास्त्रज्ञांच्या मते, इतर ठिकाणच्या सॅम्पलमध्येही असे बदल दिसून येणं गरजेचं आहे.  जर मोठ्या मोठ्या प्रमाणात व्हायरसचं जिनोम सिक्वेसिंग केलं जाईल तर असे परिणाम इतर ठिकाणाही मिळू शकतात. सध्या कोरोनाव्हायरस जगभरात थैमान घालतो आहे. आतापर्यंत 3,741,276 लोकं या व्हायरसच्या विळख्यात आहेत,  258,511  पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. भारतात एकूण 49391 प्रकरणं आहेत, तर 1694 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. संकलन, संपादन - प्रिया लाड
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Coronavirus

    पुढील बातम्या