JOIN US
मराठी बातम्या / बातम्या / Facebook ने राष्ट्रपतींच्या नावावर गंभीर चूक, मागावी लागली जाहीर माफी

Facebook ने राष्ट्रपतींच्या नावावर गंभीर चूक, मागावी लागली जाहीर माफी

इंग्रजीमध्ये केलेल्या ट्रान्सलेशनचा चुकीचा अर्थ निघाल्यामुळे फेसुबकला ही माफी मागावी लागली आहे.

जाहिरात

तिसरा क्रमांक लागतो सोशल मीडियातील अव्वल असलेल्या फेसबुकचा. जून 2019च्या आकडेवारीनुसार फेसबुकला भेट देणाऱ्यांची संख्या 19.98 अब्ज इतकी आहे.

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नेपीता, 19 जानेवारी : चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग (Xi Jinping)  यांच्या म्यानमार दौर्‍याच्या वेळी फेसबुकवर (Facebook) बर्मी भाषेतून  नावाचे इंग्रजीमध्ये चुकीचे भाषांतर केल्याबद्दल फेसुबकने शनिवारी दिलगिरी व्यक्त केली आहे. म्यानमारची (Myanmar) राजधानी नेपिताचे जिनपिंग दोन दिवसाच्या यात्रेवर होते. त्यावेळी फेसबुकने त्यांचं चुकीचं नाव लिहिलं. इंग्रजीमध्ये केलेल्या ट्रान्सलेशनचा चुकीचा अर्थ निघाल्यामुळे फेसुबकला ही माफी मागावी लागली आहे. म्यानमारच्या फेसबुक पेजवर स्वयंचलित ट्रान्सलेशन सिस्टममध्ये शी जिनपिंग यांच्या नावाचा चुकीचा अर्थ लावल्यामुळे वाद निर्माण झाला आहे. बर्मीतून इंग्रजीत ट्रान्सलेशन केलेल्या एका फेसबुक पोस्टमध्ये शी जिनपिंग यांचे नाव “मिस्टर शिटहोल” असे लिहिले गेले होते. इतर बातम्या - परीक्षेत मुन्नाभाई स्टाईल करायला गेला आणि फसला, पोलिसांकडून 4 जणांना अटक जिनपिंग यांना लिहिले ‘शिटहोल’ म्यानमारचे नेते आंग सान सू ची यांच्या अधिकृत फेसबुक पेजवर सर्वाधिक चूक दिसून आली. यापूर्वी शनिवारी पोस्ट केलेल्या अनुवादित घोषणेत म्हटले आहे की, “चीनचे अध्यक्ष मिस्टर शिटहोल  संध्याकाळी चार वाजता पोहोचले आहेत.” पुढे असे लिहिले की, “चीनचे अध्यक्ष मिस्टर शिटहोल यांनी प्रतिनिधींच्या सभेत कागदपत्रांवर स्वाक्षरी केली.” फेसबुकने व्यक्त केली दिलगिरी फेसबुकने म्हटले की, ‘हे खेदजनक आहे. तांत्रिक त्रुटीमुळे असं लिहलं गेलं.’ फेसबुकच्या प्रवक्त्याने सांगितले की, “आम्ही तांत्रिक चुक दुरुस्त केली आहे, ज्यामध्ये शी जिनपिंग यांच्या नावाचा फेसबुकवर चुकीचा अर्थ लावला गेला.” इतर बातम्या - शबाना आझमींच्या अपघातानंतर लोक का करतायत या सैनिकाला सलाम?

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या