शबाना आझमींच्या अपघातानंतर लोक का करतायत या सैनिकाला सलाम?

शबाना आझमींच्या अपघातानंतर लोक का करतायत या सैनिकाला सलाम?

जेव्हा मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर शबाना आझमी जखमी अवस्थेत पडल्या तेव्हा तिथे एक सैनिक उपस्थित होता.

  • Share this:

मुंबई, 19 जानेवारी : बॉलिवूड अभिनेत्री शबाना आझमी (Shabana Azmi) शनिवारी कार अपघातात गंभीर जखमी झाल्या. वाढदिवसानिमित्त पती जावेद अख्तर (Javed Akhtar) यांच्याबरोबर त्या वांद्रेहून खंडाळ्याला जात होत्या. यादरम्यान, मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर त्यांच्या गाडीला अपघात झाला. यात शबाना जखमी झाल्या होत्या. प्राथमिक उपचाराकरिता त्यांना पनवेलमधील एमजीएम रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र, नंतर मुंबईतील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात उपचारासाठी शबाना यांना दाखल करण्यात आलं.

या सगळ्या दरम्यान सोशल मीडियावर एका सैनिकाचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सगळे जण हा सैनिकाला सलाम करत आहेत. खरंतर, जेव्हा मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर शबाना आझमी जखमी अवस्थेत पडल्या तेव्हा तिथे एक सैनिक उपस्थित होता. शबाना यांना पाहताच तो मदतीसाठी खाली बसला. शबाना यांच्या कारला अपघात होताच त्याचे अनेक फोटो माध्यमांमध्ये प्रसिद्ध झाले.

या सगळ्या फोटोंमध्ये या सैनिकाचा शबाना आझमीला मदत करतानाच्या फोटोला लोकांनी पसंती दिली आहे. एखाद्याला दुखापत झाल्यानंतर तात्काळ मदतीला आल्यामुळे या सैनिकाचं नेटकऱ्यांनी अभिनंदन करत त्याच्या कामगिरीला सलाम केलं आहे.

शबाना आझमी यांनी कोणत्याही सैन्यातील व्यक्तीबद्दल कधीच नकारार्थी वक्तव्य केलं नाही. मात्र, त्यांनी सरकारबद्दल अनेक प्रश्न उपस्थित केले होते. तेव्हापासून त्या सतत सोशल मीडियावर आपल्या वक्तव्यांविषयी ट्रोल होत असतात. पुण्याच्या दिशेने जाताना मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर शबाना आझमी यांच्या सफारी गाडीने ट्रकला मागून धडक दिल्याने हा अपघात झाला. याप्रकरणी आता ट्रक चालकाने आझमी यांच्या गाडीच्या ड्रायव्हरविरोधात तक्रार दाखल केली आहे. कारण अपघातात आजमी यांच्या गाडीसह ट्रकचंही नुकसान झालं आहे.

शबाना आझमी यांच्या अपघातानंतर त्या लवकरात लवकर बऱ्या व्हाव्यात यासाठी देशभरातून प्रार्थना करण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही यासंदर्भात ट्वीट केलं आहे. 'शबाना आझमी यांच्या अपघाताचं वृत्त वेदनादायी आहे. त्या लवकर बऱ्या होण्यासाठी मी प्रार्थना करतो,' असं ट्वीट नरेंद्र मोदी यांनी केलं आहे.

दरम्यान, पुण्याच्या दिशेला जाताना खालापूर येथे शबाना आझमी यांच्या गाडीला अपघात झाला. खालापूर टोल नाक्याजवळ पुढे जाणाऱ्या ट्रकला शबाना आझमी यांच्या टाटा सफारी गाडीने मागून जोरदार धडक दिली. या अपघातात शबाना आझमी यांच्यासह त्यांच्या गाडीचा चालकही जखमी झाला आहे.

शबाना आझमी यांची प्रकृती ठीक होण्यासाठी देशभरातील मान्यवरांनी प्रार्थना केली आहे. 'शबाना आझमी यांचा अपघात झाल्याचं कळाल्यानंतर वाईट वाटलं. त्यांची प्रकृती लवकर सुधारावी यासाठी प्रार्थना करते,' असं ट्वीट गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी केलं आहे.

कोण आहेत शबाना आझमी?

-शबाना आझमी यांचा जन्म 18 सप्टेंबर 1950 रोजी झाला

-अंकुर या हिंदी चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण

-आझमी यांनी आतापर्यंत आपल्या करिअरमध्ये जवळपास 130 पेक्षा जास्त चित्रपटात काम केले

-जुनून, शतरंज के खिलाडी, कंधार, स्पर्श, पार, सती, अर्थ, गॉडमदर यासारख्या अनेक चित्रपटात काम

- जॉन श्लेसिंगर यांचा मॅडम सोऊसाटस्का आणि रोनाल्ड जॉफ यांचा सिटी ऑफ जॉय या हॉलिवू़ड चित्रपटातही काम

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 19, 2020 01:51 PM IST

ताज्या बातम्या