मुंबई, 9 जुलै: विधानसभेचे विरोधीपक्ष नेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस या पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. अमृता फडणवीस यांची एका फोटोवरून सोशल मीडियावर तूफान खिल्ली उडवली जात आहे. विशेष म्हणजे अमृता यांचा फोटो आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हेही वाचा… गणेशोत्सवाला कोकणात येणाऱ्या मुंबईतील चाकरमान्यांसाठी शिवसेनेचा नवा प्लॅन काय आहे प्रकरण? अमृता फडणवीस या कम्युनिटी हेल्थ सर्व्हिस 2019-20 अंतर्गत वर्कशॉपमध्ये सहभागी झाल्या होत्या. वेबिनारच्या माध्यमातून त्यांनी डॉक्टरांशी संवाद साधला. तसेच ‘समाजोपयोगी आरोग्य उपक्रमाची गरज आणि परिणाम’ या विषयावर अमृता यांनी त्यांनी डॉक्टरांशी चर्चा केली. दरम्यान, अमृता यांनी सोशल मीडियावरया या वेबिनारचे फोटो शेअर केले आहे. यामधील एका फोटोवरून त्या आता ट्रोलर्सच्या निशाण्यावर आल्या आहेत.
अमृता फडणवीस या आरोग्याच्या संदर्भातील या कार्यशाळेत सहभागी झाल्या होत्या. यावेळी त्यांच्या टेबलवर एका कागद होता. त्यावर तीन अक्षरांचं एक वाक्य लिहिलं होतं. या एका वाक्यावरून अमृता पुन्हा एकदा ट्रोलर्सच्या टीकेच्या धनी बनल्या आहेत. अमृता फडणवीस यांनी वेबिनारचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. एका फोटो टेबलवर एक एक कागद दिसत आहे. त्यावर काहीतरी लिहिलेलं दिसत आहे. फोटो झूम करून पाहिल्यानंतर त्यावर ‘फोटो लेते रहो’ असं लिहिलेलं दिसत आहे. हेही वाचा… मुंबईत हायअलर्ट! समुद्रात उसळणार उंच लाटा, हवामान विभागाने दिला कडक इशारा आता अमृता यांचा हाच फोटो सोशल मीडियात प्रचंड व्हायरल होत आहे. ‘फोटो लेते रहो’ असं म्हणत अमृता यांची तूफान खिल्ली उडवली जात आहे.