रत्नागिरी, 9 जुलै: मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात कोरोनानं थैमान घातलं आहे. मुंबईत कोरोनाचा सर्वाधिक प्रादुर्भाव आहे. त्यात गणेशोत्सव जवळ येत आहे. गणेशोत्सवात कोकणात जाणं ही मुंबईकरांची परंपरा आहे. अनेक चाकरमानी गणेशोत्सवासाठी कोकणात जात असतात. यासाठी शिवसेनेनं नवा प्लॅन केला आहे.
हेही वाचा..मुंबईत हायअलर्ट! समुद्रात उसळणार उंच लाटा, हवामान विभागाने दिला कडक इशारा
शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी सांगितलं की, गणेशोत्सवासाठी मुंबईकर आणि बाहेरुन येणाऱ्या चाकरमान्यांसाठी अनेक ग्रामपंचायतींनी पत्र लिहिलं आहे. या पत्रात चाकरमान्यांसाठी काही सूचनाही करण्यात आल्या आहेत. गणेशोत्सवाच्या आधी काही दिवस गावी या आणि होम क्वारंटाईन व्हा, असं कोकणातील अनेक गावकऱ्यांचं म्हणणं आहे. त्यानुसार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे तीन मागण्या करण्यात आल्या आहेत. त्या म्हणजे कोकणात गणेशोत्सवाला येणाऱ्यांना 14 ऐवजी 7 दिवसं क्वारन्टाईन करावे. कोकणात येणाऱ्या प्रत्येक चाकरमान्यांची सवलतीत किंवा मोफत कोविड टेस्ट करावी आणि कोकणातल्या गणेशभक्तानी यंदा 11 ऐवजी 7 दिवसांचाच घरगुती गणेशोत्सव करावा, अशा मागण्या करण्यात आल्या आहेत.
दुसरीकडे, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पारंपरिक गणेशोत्सव कसा साजरा करायचा याबाबत निर्णय घेण्यासाठी रत्नागिकी, सिंधुदुर्ग, मालवण आणि रायगड जिल्ह्यातील ग्रामपंचायतींनी बैठका सुरू केल्या आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यातील तिथवली दिगाशी गावकऱ्यांनी गणेशोत्वासाठी मुंबईहून येणाऱ्या चाकरमान्यांसाठी सूचनांसह पत्र लिहिलं आहे. त्याचप्रमाणे कोकणातील अनेक ग्रामपंचायतींनी पत्रप्रपंच केला आहे.
हेही वाचा.. सोन्याचे रेकॉर्ड ब्रेकिंग दर कायम, लवकरच 50 हजारांचा टप्पा पार करण्याची शक्यता
गणेशोत्सवासाठी मुंबईहून हजारो लोकं आपल्या कुटुंबीयासह आपल्या मूळ गावी येत असतात. मात्र, यंदाच्या गणेशोत्सवावर कोरोनाचं संकट आहे. त्यात मुंबई शहर हे कोरोनाचा हॉटस्पॉट आहे. या पार्श्वभूमीवर गणेशोत्सव सर्व सावधगिरीने आणि सोशल डिस्टंसिंग ठेऊन साजरा करण्यात येईल, असा निर्णय कोकणातील अनेक ग्रामपंचायतींनी घेतला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.