JOIN US
मराठी बातम्या / बातम्या / Coronavirus: 24 तासांत पुन्हा झाला कोरोनाचा उद्रेक, रुग्णांच्या संख्येने मोडले सगळे रेकॉर्ड

Coronavirus: 24 तासांत पुन्हा झाला कोरोनाचा उद्रेक, रुग्णांच्या संख्येने मोडले सगळे रेकॉर्ड

आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, 1065 लोकांचा मृत्यू झाला आहे.

जाहिरात

Navi Mumbai: Shiv Sena MP Rajan Vichare being tested for COVID-19 during the nationwide lockdown to curb the spread of coronavirus, in Navi Mumbai, Saturday, April 18, 2020. (PTI Photo)(PTI18-04-2020_000127B)

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 06 सप्टेंबर : कोरोना व्हायरसचा (Coronavirus) संसर्ग देशात झपाट्याने वाढताना दिसत आहे. रोज कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांची नवीन संख्या समोर येत आहे. कोरोना रूग्णांची संख्या शनिवारी विक्रमी 90 हजारांवर पोहोचली होती. त्यानंतर आता गेल्या 24 तासांत 90 हजार 632 असा कोरोना (Corona) रुग्णांचा नवा आकडा समोर आला आहे. तर आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, 1065 लोकांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाच्या या नव्या संख्येमुळे देशात कोरोना संक्रमित रूग्णांची एकूण संख्या 41, 13,811 इतकी झाली आहे. शुक्रवारी देशात 86,432 नवीन रुग्ण आढळले तर 1089 लोकांचा मृत्यू झाला होता. कोरोना संक्रमणात ब्राझीलला (Brazil) मागे टाकून भारत (India) आता जगात दुसर्‍या क्रमांकावर पोहोचला आहे. त्यामुळे आता नागरिकांमध्ये चिंता वाढत चालली आहे. Good News: कोरोना लसीचा दुसरा टप्पा सुरू, भारत बायोटेक करणार क्लिनिकल ट्रायल आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, देशात कोरोनाचे 8 लाख 62 हजार 320 अॅक्टिव्ह कोरोना रुग्ण आहेत. या जीवघेण्या संसर्गामुळे आतापर्यंत 70 हजार 626 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्याचबरोबर आतापर्यंत 31 लाख 80 हजार 865 लोकांनी कोरोनावर मात करून ते बरे झाले. खरंतर ही एक दिलासादायक बाब आहे. गुंदेचा बंधूंवर लैंगिक अत्याचाराचा आरोप, FB वर विदेशी शिष्याची धक्कादायक पोस्ट दरम्यान, महाराष्ट्रात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आहेत. राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत दररोज उच्चांकी वाढ होत आहेत. शनिवारी आत्तापर्यंतची सर्वात जास्त संख्या आढळली. 24 तासांमध्ये तब्बल 20 हजार 489 नवे कोरोनाबाधित आढळले आहेत. तर 312 मृत्यू झाला. राज्यात सध्या 2 लाख 20 हजार 661 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर राज्यातल्या कोरोना रुग्णाची एकूण संख्या 8 लाख 83 हजार 862 एवढी झाली आहे. मुंबई आणि महाराष्ट्रात कोरोनाचा वेग वाढत असतांनाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी मुंबई महानगरपालिका वॉर्ड अधिकारी, उपायुक्त, वैद्यकीय अधीक्षक आणि अधिष्ठाता यांची बैठक घेऊन परिस्थितीचा आढवा घेतला यावेळी बोलतांना मुख्यमंत्री म्हणाले महाराष्ट्रासाठी पुढचे तीन महिने धोक्याचे आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या