Home /News /news /

Good News: कोरोना लसीचा दुसरा टप्पा सुरू, भारत बायोटेक करणार क्लिनिकल ट्रायल

Good News: कोरोना लसीचा दुसरा टप्पा सुरू, भारत बायोटेक करणार क्लिनिकल ट्रायल

भारत बायोटेक (Bharat Biotech) द्वारा विकसित केलेल्या कोरोना लसीच्या पहिल्या टप्प्यातील चाचणी पूर्ण झाली आहे. त्यानंतर आता कंपनीने क्लिनिकल चाचण्यांच्या दुसऱ्या फेरीची तयारी केली असल्याची माहिती देण्यात आली आहे.

    नवी दिल्ली, 06 सप्टेंबर : देशभर कोरोना व्हायरसचा (Coronavirus) कहर सुरूच आहे. रोज कोरोनाच्या नव्या रुग्णांची संख्या समोर येते. गेल्या काही दिवसांमध्ये, दररोज सरासरी 80 हजारांहून जास्त नवीन कोरोना रुग्ण समोर येत आहेत. अशात संपूर्ण हे कोरोना लसीची (Corona Vaccine) वाट पाहत आहे. यादरम्यान सगळ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. भारत बायोटेक (Bharat Biotech) द्वारा विकसित केलेल्या कोरोना लसीच्या पहिल्या टप्प्यातील चाचणी पूर्ण झाली आहे. त्यानंतर आता कंपनीने क्लिनिकल चाचण्यांच्या दुसऱ्या फेरीची तयारी केली असल्याची माहिती देण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कोरोना लसीच्या दुसऱ्या फेरीसाठी ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (DCGI) कडून परवानगी मागण्यात आली आहे. तर मानवी चाचण्यांची दुसरी फेरीही काही आठवड्यांत सुरू होईल आणि यशस्वीरित्या पूर्ण होईल अशी सगळ्यांना अपेक्षा आहे. गुंदेचा बंधूंवर लैंगिक अत्याचाराचा आरोप, FB वर विदेशी शिष्याची धक्कादायक पोस्ट क्लिनिकल चाचण्यांची फेरी दुसरी इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, भारत बायोटेकने क्लिनिकल चाचण्यांच्या दुसऱ्या फेरीबाबत विषय समितीला (SEC) पत्र लिहलं आहे. DCGI च्या डॉक्टर एस ऐश्वर्या रेड्डी यांनी त्याला उत्तर म्हणून 380 लोकांवर चाचणी करण्यासाठी सुचवलं आहे. खरंतर, कुठल्याही लसीमध्ये तीन टप्प्यांत क्लिनिकल चाचण्या केल्या जातात. पहिल्या टप्प्यात, जर त्याचा उपयोग झाला तर लोकांना कोणता धोका होतो की नाही याची माहिती मिळते. म्हणजेच त्याचा वापर सुरक्षित आहे की नाही याचा शोध लागला जातो. आई समान सासूला जावयाने कायमचं संपवलं, डोक्यात लाकडी ओंडका घालून घेतला जीव दुसर्‍या टप्प्यात, अधिकाधिक लोकांना शोधून ही लस किती प्रभावी आहे याची माहिती मिऴवली जात तर तिसऱ्या आणि शेवटच्या टप्प्यामध्ये हजारो लोकांवर याचे प्रयत्न केले जातात. Good News! 24 तासांत रिकव्हरी दरानं मोडले सगळे रॅकॉर्ड, 5 राज्यांत रुग्णसंख्या झाली कमी तिसऱ्या लसीवर सुरू आहे काम पहिल्या टप्प्यामध्ये भारत बायोटेकने 12 शहरांमध्ये लसीची चाचणी केली आहे. यावेळी तब्बल 375 लोकांवर चाचणी केली गेली. भारतात सध्या या लसीवर काम सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे. गुजरातची कंपनी जायडस कॅडिला हेल्थ केअर लिमिडेट आणि सीरम इंस्टिट्यूट पूणे दुसऱ्या टप्प्यातील क्लिनिकल ट्रायलसाठी पहिली फेरी सुरू करण्याच्या तयारीत आहेत. दरम्यान, वैज्ञानिकांना कोरोना लसीला ग्रीन सिग्नल देताच भारतात मोठ्या प्रमाणावर लसीचं उत्पादन करू असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे.
    Published by:Renuka Dhaybar
    First published:

    Tags: Corona, Coronavirus, Coronavirus symptoms

    पुढील बातम्या