मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

प्रसिद्ध गायक गुंदेचा बंधूंवर लैंगिक अत्याचाराचा आरोप, FB वर विदेशी शिष्याने केली धक्कादायक पोस्ट

प्रसिद्ध गायक गुंदेचा बंधूंवर लैंगिक अत्याचाराचा आरोप, FB वर विदेशी शिष्याने केली धक्कादायक पोस्ट

गेल्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने गुंदेचा बंधूंमधील रमाकांत यांचं निधन झालं. त्यांचा मोठा भाऊ उमाकांत गुंदेचा हे ध्रुपद संस्थानचे प्रमुख आहेत.

गेल्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने गुंदेचा बंधूंमधील रमाकांत यांचं निधन झालं. त्यांचा मोठा भाऊ उमाकांत गुंदेचा हे ध्रुपद संस्थानचे प्रमुख आहेत.

गेल्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने गुंदेचा बंधूंमधील रमाकांत यांचं निधन झालं. त्यांचा मोठा भाऊ उमाकांत गुंदेचा हे ध्रुपद संस्थानचे प्रमुख आहेत.

  • Published by:  Renuka Dhaybar

भोपाळ, 06 सप्टेंबर : सोशल मीडियावर (Social Media) प्रसिद्ध ध्रुपद गायक गुंदेचा बंधूंवर (Bundela Brothers) गंभीर आरोप करण्यात आले आहेत. फेसबुक पोस्टद्वारे विदेशी मुलीने त्यांच्यावर लैंगिक छळाचा (Sexual Harassment) आरोप केला असल्याची माहिती समोर येत आहे. तर या आरोपावर तातडीने चौकशी करण्यासाठी अंतर्गत समिती गठीत करण्याचे आदेश देण्यात आले असून चौकशीत कोणताही मुद्दा आल्यास कारवाईचा निर्णय घेतला जाईल असंही सांगण्यात आलं आहे.

गेल्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने गुंदेचा बंधूंमधील रमाकांत यांचं निधन झालं. त्यांचा मोठा भाऊ उमाकांत गुंदेचा हे ध्रुपद संस्थानचे प्रमुख आहेत. अखिलेश गुंदेंचा हा छोटा भाऊ आहे आणि ते एक पखवाज वादक आहेत. 2012 मध्ये गुंदेचा बंधूंना पद्मश्री आणि 2017 मध्ये संगीत नाटक अकादमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. खरंतर, ध्रुपद हे देशातील सगळ्यात प्राचीन शास्त्रीय संगीत आहे. ध्रुपद संस्थान हे एक शास्त्रीय संगीत गुरुकुल आहे ज्याला युनेस्कोने अमूर्त सांस्कृतिक वारसा म्हणून दर्जा दिला आहे.

आई समान सासूला जावयाने कायमचं संपवलं, डोक्यात लाकडी ओंडका घालून घेतला जीव

फेसबुकवर शेअर केली पोस्ट

भोपाळ इथे राहणाऱ्या प्रतिष्ठित अशा निवासी रहिवासी संगीत गुरुकुल ध्रुपद संस्थानचे दोन प्रसिद्ध गुरू रमाकांत गुंदेचा आणि अखिलेश गुंदेचा यांच्यावर लैंगिक छळाचा आरोप करण्यात आला आहे. युरोप नावाच्या फेसबुक ग्रुपवर यासंबंधी एक पोस्ट शेअर करण्यात आली आहे. इतकंच नाही तर या संगीतकारांच्या विद्यार्थ्यांदेखील ईमेल पाठवण्यात आले आहेत. यामध्ये बर्‍याच वर्षांपासून या दोन गुरूंकडून माझा लैंगिक छळ झाला असल्याचा आरोप करण्यात आला आहे. आम्सटरडॅमच्या योग शिक्षकाने फेसबुकवर ही पोस्ट लिहिली आहे. तर यावेळी ओळख उघड होऊ नये त्यांनी एका मित्राच्यामदतीने संपूर्ण घटना सोशल मीडिया शेअर केली आहे.

पावसाळी अधिवेशनावर कोरोनाचं संकट, असा पार पडणार पहिला दिवस

गुंदेचा बंधूंवर गंभीर आरोप

आम्ही तक्रार केली तर बदला घेण्याच्या भीतीने, लोकांनी आमच्यावरच टीका केली असती या भीतीने आणि सगळ्यात धक्कादायक म्हणजे गुंदेचा बंधूंकडून आम्हाला धमकावण्यात आलं होतं. त्यामुळे आम्ही हा प्रकार फेसबूकवर शेअर केला असल्याचं पोस्टमध्ये म्हटलं आहे. दोघांनीही बऱ्याच विद्यार्थ्यांचे लैंगिक छळ केले असल्याचं त्यांनी पोस्टमध्ये लिहिलं आहे. शिक्षकांनी महिला विद्यार्थ्यांना वाईट पद्धतीने स्पर्श केल्याचा आरोपही पोस्टमध्ये केला आहे. पोस्टमध्ये पीडितेने लिहिले की आतापर्यंत जे घडले त्याबद्दल मी फक्त माझ्या कुटूंबाला सांगितले आहे. मी संस्थेतल्या कोणाशीही याबद्दल बोललो नाही.

दरम्यान, या सगळ्यावर संस्थानाकडून समिती नेमण्यात येणार असून यातून प्रकरणाची चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. यावर आंतरराष्ट्रीय पातळीवर गुरुकुलला बदनाम करण्यासाठी असा प्रयत्न केला जात असल्याचं समर्थकांनी म्हटलं आहे.

First published: