JOIN US
मराठी बातम्या / बातम्या / लेकरासाठी आई कोरोनाशी लढली, 22 दिवसांच्या मरणयातनेनंतर दिला गोड बाळाला जन्म

लेकरासाठी आई कोरोनाशी लढली, 22 दिवसांच्या मरणयातनेनंतर दिला गोड बाळाला जन्म

घरातील सूनेनं आणि गर्भवती स्त्रीनं मोठ्या जिद्दीने कोरोनाला पराभूत केलं आणि शुक्रवारी रात्री एका गोड मुलाला जन्म दिला.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

इंदूर, 19 एप्रिल : हिम्मतीने दुखावर मात केली तर सुखाचे दिवसही येतात हे चंदननगरच्या एका खान कुटुंबापेक्षा जास्त कुणीही सांगू शकत नाही. गेले 22 दिवस खान कुटुंबावर आभाळ कोसळलं होतं. आईचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता. एक मुलगा आणि सून देखील कोरोना संक्रमित झाल्याचे आढळले आणि कुटुंबातील सहा सदस्य क्वारंटाईन केंद्रात पाठवण्यात आले. घरातील सूनेनं आणि गर्भवती स्त्रीनं मोठ्या जिद्दीने कोरोनाला पराभूत केलं आणि शुक्रवारी रात्री एका गोड मुलाला जन्म दिला. मिळालेल्या माहितीनुसार, आई आणि बाळ दोन्हीही सुरक्षित आहेत. पण क्वारंटाईन असल्यामुळे वडील आपल्या पत्नी आणि मुलाला भेटूही शकले नाहीत. पण आपल्याला मुलगा झाला आहे हे पत्नी सुखरुप आहे हे ऐकल्यावर पतीच्या जीवात जीव आला. आता फक्त पत्नी घरी येण्याची सर्वजन वाट पाहत आहेत. चंदन नगरमध्ये राहणारी फराह 25 मार्च रोजी कोरोनामध्ये संक्रमित असल्याचे आढळले होते. परंतु ती गर्भाशत आणखी एका जीवाला सांभाळत होती. आठ महिने पूर्ण होणार होते. आपल्या आजाराची उष्णता गर्भावर येऊ नये म्हणून तीला भीती वाटली, परंतु उलट परिस्थितीत तिने धैर्य गमावले नाही. सुमारे सहा दिवसांपूर्वी फराहचा अहवाल निगेटिव्ह आला होता, परंतु प्रसुतीचा काळ जवळ असल्याने अरबिंदो हॉस्पिटलमधून सोडलं नाही. दिल्ली हादरली! एकाच कुटुंबातील तब्बल 31 जणांना कोरोनाची लागण, परिसरात खळबळ शुक्रवारी फराहने मुलाला जन्म दिला. डॉक्टरांच्या मते, आई आणि मूल निरोगी आहेत. मुलालाही कोरोनाची कोणतीही लक्षणे नाही. एका आठवड्यानंतर रुग्णालयातून सोडण्यात येईल. त्यामुळे ही अतिशय आनंदाची बाब आहे. मुलाचे नाव ठेवले ‘नूर’ मुलाचे वडील इम्रान म्हणाले की, मी 25 मार्चपासून पत्नीला पाहिले नव्हते. कोरोनाच्या संसर्गामुळे गेल्या महिन्यात माझ्या आईचे निधन झाले. अद्याप या धक्क्यातून बरे झालेलो नाही. पत्नीला कोरोना इन्फेक्शन झाले आणि मी स्वत: घरी क्वारंटाईनमध्ये आहे. फक्त मुलाचे फोटो पाहिले. अशा प्रतिकूल परिस्थितीतसुद्धा आमच्या इथे आनंदाची नूर आहे, म्हणून मी माझ्या मुलाचे नाव मोहम्मद नूर ठेवले आहे. आईच्या एका सल्ल्यानं बदललं आयुष्य, UPSC मध्ये 4 वेळा अपयशानंतर झाला IPS

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Tags:

फोटो

महत्वाच्या बातम्या