JOIN US
मराठी बातम्या / बातम्या / Coronavirus वर मात करणारी देशातील 'ती' पहिली कोरोना रुग्ण सध्या काय करतेय?

Coronavirus वर मात करणारी देशातील 'ती' पहिली कोरोना रुग्ण सध्या काय करतेय?

चीनहून भारतात परतलेली केरळमधील विद्यार्थीनी भारतातील पहिला कोरोना रुग्ण (India first coronavirus patient) आहे. तिने कोरोनाव्हायरसवर मात केली आहे.

जाहिरात

सोमवारी सकाळपर्यंत देशात 45,149 नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे रुग्णांची एकूण संख्या ही 79,09,960 एवढी झाली आहे.

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

तिरुवनंतपुरम, 01 मे : भारतात सध्या कोरोनाव्हायरसचे (Coronavirus) 33 हजारांपेक्षा जास्त रुग्ण आहेत. कोरोनाव्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी लॉकडाऊन लागू करण्यात आलं आहे. प्रत्येक जण आपापल्या घरात आहेत. अशात कोरोनाचा पहिला रुग्ण आता नेमकं काय बरं करतोय? चला पाहुयात. देशात कोरोनाव्हायरसचा पहिला रुग्ण सापडला तो केरळात (Kerala).  चीनच्या वुहानमध्ये वैद्यकीय शिक्षण घेत असलेली विद्यार्थीनी निशा (नाव बदललेलं) जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात भारतात परतली. त्यानंतर तिला कोरोनाव्हायरसच असल्याचं निदान झालं. थ्रिसूर मेडिकल कॉलेज रुग्णालयात तिच्यावर जवळपास तीन आठवडे उपचार झाले, त्यानंतर ती कोरोनामुक्त झाली. कोरोना रिपोर्ट नेगेटिव्ह आल्यानंतर 20 फेब्रुवारीला तिला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. हे वाचा -  Corona चे स्रोत मानली जाणारी वटवाघळंच आता व्हायरसपासून वाचवणार? चीनच्या वुहान युनिव्हर्सिटीत शिक्षण घेत असलेली निशा आता याच युनिव्हर्सिटीचं ऑनलाइन शिक्षण घेत आहे. थ्रिसूर जिल्ह्यातून या रुग्णाने पीटीआयशी फोनवर संवाद साधला, ती म्हणाली, “चीनच्या ज्या युनिव्हर्सिटीत मी शिकत होते, त्याच युनिव्हर्सिटीचं ऑनलाइन शिक्षण घेत आहे. सकाळी साडेपाच वाजता (चीनी वेळेनुसार सकाळी आठ वाजता) आमचे वर्ग सुरू होतात, ते सकाळी नऊपर्यंत सुरू असतात. मध्ये 10 मिनिटांचा ब्रेक मिळतो. विषयांनुसार दररोज धडे घेतले जातात. युनिव्हर्सिटीच्या प्राध्यापकांमध्ये चीन, पाकिस्तान आणि श्रीलंकेतील शिक्षण आहेत. मात्र आमच्यासाठी असलेले बहुतेक  प्राध्यापक चीनी आहेत आणि ते आम्हाला इंग्रजी भाषेत शिकवतात. सध्या ज्या विषयांचे ऑनलाइन वर्ग सुरू आहेत, ते विषय नियमित वर्ग सुरू झाल्यानंतर पुन्हा शिकवले जातील कारण प्रॅक्टिअलही बाकी आहेत. विद्यार्थी परतल्यानंतर वर्ग नव्याने सुरू होतील, मात्र त्याचा कालावधी अद्याप निश्चित नाही, असं युनिव्हर्सिटीने सांगितल्याचंही तिनं म्हटलं. वुहानमध्ये आता कोणताच रुग्ण नाही, आम्हाला तसंच सांगण्यात आलं आहे”, असंही तिनं सांगितलं. हे वाचा -  ‘Make or Break’, कोरोना लढ्यात भारतासाठी मे महिना महत्त्वाचा; तज्ज्ञांचा सल्ला ऑनलाइन वर्गानंतर मिळणारा रिकामा वेळ कसा घालवते असं विचारल्यानंतर निशानं आपण आपला स्वयंपाकाचा छंद जोपासत असल्याचं सांगितलं. ती म्हणाली, “मला स्वयंपाक करायला खूप आवडतं. वुहानच्या वसतिगृहातही किचन होतं, तिथं माझं जेवण मी स्वत: बनवायचे. आता इथं आईची स्वयंपाकात मदत करते. आईसोबत मी दररोज नवनवीन पदार्थ बनवते. आम्ही समोसे बनवतो, कटलेट बनवतो आणि ग्रील चिकनही” कोरोनाव्हायरसवर यशस्वी मात करून डिस्चार्ज मिळाल्यानंतर निशानं ‘हिंदुस्तान टाईम्स’ला दिलेल्या मुलाखतीत आपला कोरोनाव्हायरशी लढतानाचा पूर्ण अनुभव सांगितला होता. तिचा हा अनुभव इतर कोरोनाव्हायरसच्या रुग्णांसाठी प्रेरणादायी आहे. हे वाचा -  Coronaविरोधी लढ्यात मुक्या जीवांची मदत, लवकरच कुत्रा ओळखणार कोरोनाग्रस्त व्यक्ती निशा म्हणाली, “या आजाराला मी घाबरत नाही कारण त्याला अगदी जवळून ओळखू लागले. निरोगी व्यक्तींना या व्हायरसची लागण झाल्यास जास्त समस्या उद्भवणार नाही. मात्र ज्यांची रोगप्रतिकारक शक्ती कमजोर आहे, अशांसाठी हा व्हायरस जीवघेणा ठरू शकतो” “कोरोनाव्हायरसचा लढा मी जिंकला तो एकटीनं नव्हे. माझ्यावर उपचार करणारे डॉक्टर, सोयीसुविधा उपलब्ध करून देणारं सरकार आणि नागरिकांच्या प्रार्थना माझ्यासोबत होत्या, त्या सर्वांना माझा सॅल्युट आहे. माझ्यात आता पॉझिटिव्ह एनर्जी आली आहे आणि मला माझ्या वैद्यकीय क्षेत्राबाबत असलेला अभिमान अधिक वाढला आहे”, असं निशा म्हणाली. चीनमधील परिस्थिती सुधारल्यानंतर आपलं वैद्यकीय शिक्षण पूर्ण करण्यासाठी आपण पुन्हा चीनला जाणार असल्याचं निशानं सांगितलं आणि ज्या लोकांनी तिला साथ दिली त्यांच्यासाठी ती उभं राहणार त्यांची सेवा करणार असा दृढ निश्चय तिनं केला आहे. संकलन, संपादन  - प्रिया लाड

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या