'Make or Break', कोरोना लढ्यात भारतासाठी मे महिना महत्त्वाचा; तज्ज्ञांनी दिला सल्ला

'Make or Break', कोरोना लढ्यात भारतासाठी मे महिना महत्त्वाचा; तज्ज्ञांनी दिला सल्ला

रेड झोनमध्ये आक्रमक नियंत्रण रणनीती आणि ग्रीन झोनमध्ये काळजीपूर्वक शिथीलता देण्याची गरज असल्याचं, मत तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 30 एप्रिल : कोरोनाव्हायरसचा (Coronavirus) प्रसार रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनची (lockdown) डेडलाइन जवळ येऊ लागली आहे. 3 मेला लॉकडाऊन संपणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सोमवारी राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना कोरोनाव्हायरशील लढताना अर्थव्यवस्थाही महत्त्वाची असल्याचं सांगितलं.  शिवाय काही प्रमाणात शिथीलतेसह हा लॉकडाऊन वाढू शकतो, असे स्पष्ट संकेतही केंद्र सरकारने दिलेत. आता भारताच्या कोरोनाव्हायरसविरोधातील लढ्यात मे महिना हा महत्त्वाचा आहे.

कोरोनाव्हायरसविरोधातील लढ्यात मे महिना हा Make or Break ठरू शकतो. त्यामुळे रेड झोनमध्ये आक्रमक नियंत्रण रणनीती आणि ग्रीन झोनमध्ये शिथीलता देत लक्ष ठेवण्याची गरज आहे, असा सल्ला आरोग्य तज्ज्ञांनी दिला आहे.

अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतात पंधरा दिवसांपूर्वी कोरोनाच्या हॉटस्पॉट असलेल्या जिल्ह्यांची संख्या 170 वरून 129 वर आली मात्र त्याचवेळी कोरोनामुक्त जिल्हे किंवा ग्रीन झोनची संख्याही 325 वरून 307 वर आली आहे. तसंच नॉन-हॉटस्पॉट जिल्हे म्हणजेच ऑरेंज झोनही 207 वरून 297 झालेत.

हे वाचा - परदेशात अडकलेले भारतीय परत येणार, मोदी सरकारने तयार केला आराखडा

फोर्टिस नोएडाच्या पल्मनॉलॉजी अँड क्रिटिकल केअरचे अतिरिक्त संचालक डॉ. राजेश कुमार गुप्ता म्हणाले, "लॉकडाऊनमुळे व्हायरसचा नाश होणार नाही, तर फक्त त्याच्या प्रसाराचा वेग कमी होईल हे समजण्याची गरज आहे"

कोरोनाव्हायरसविरोधातील लढ्यात मे महिना हा मेक किंवा ब्रेक असू शकतो आणि ज्या ठिकाणी कोरोनाव्हायरसची प्रकरणं आहेत, त्याठिकाणी नियंत्रण असणं खूप महत्त्वाचं आहे. रेड झोनमध्ये 2 आठवडे किंवा आणखी काही वेळ लॉकडाऊन कायम ठेवावा आणि ग्रीन झोनमधील परिस्थिती पाहून तेथील लॉकडाऊन उठवावा, मात्र तिथं व्हायरस पोहोचणार नाही आणि ते क्षेत्र संक्रमणमुक्त राहिल हे आधी सुनिश्चित करायला हवं", असं डॉ. गुप्ता पीटीआयशी बोलताना म्हणालेत.

हे वाचा - लॉकडाउनमध्ये राज्यातून बाहेर जायचंय? हे आहेत नियम

सर गंगाराम रुग्णालयातील लंग सर्जन डॉ. अरविंद कुमार यांनी सांगितलं, "रेल्वे, विमान सेवा, आंतरराज्यीय बससेवा, मॉल्स, शॉपिंग कॉम्प्लेक्स, धार्मिक ठिकाणं आणि इतर अशीच काही ठिकाणं मे महिन्यात बंद असावीत. ग्रीन झोन जिल्ह्याच्या सीमा सील कराव्यात आणि काही मर्यादित गोष्टींनाच परवानगी द्यावी. तसंच सोशल डिस्टन्सिंग, मास्क वापरणं, हात धुणं हा लोकांच्या जीवनशैलीचा भाग असावा"

"आतापर्यंत भारतानं कोरोनाव्हायरसविरोधात खूप चांगला लढा दिला आहे आणि आता या लढ्यात मे महिना खूप महत्त्वाचा आहे. ज्या ठिकाणी कोरोनाची प्रकरणं आहेत, तिथंली प्रकरणं जोपर्यंत कमी होत नाहीत. तोपर्यंत लॉकडाऊन कायम ठेवावा. रेड झोनमध्ये आक्रमक नियंत्रण रणनीती असावी. प्रत्येक प्रकरणांवर लक्ष आणि त्याचा पाठवपुरावा करणं खूप महत्त्वाचं आहे आणि अतिशय काळजीपूर्वक ग्रीन झोनला शिथीलता द्यावी", असं डॉ. अरविंद कुमार म्हणाले.

हे वाचा - निळे ओठ, पिवळं शरीर; चिमुकल्यांमध्ये कोरोनाची लक्षणं की नव्या व्हायरसचं संकट?

मॅक्स हेल्थकेअरच्या इंटरनल मेडिसीनचे सहसंचालक डॉ. रोमोल टिक्कू म्हणाले, "कोविड-19 विरोधातील लढ्याच्या सध्याच्या परिस्थिती अधिक शिथीलता देणं म्हणजे संकट ठरू शकतं. मे महिना हा मेक किंवा ब्रेक असू शकतो. थोडी जरी कसर सुटली तरी मोठ्या प्रमाणात प्रसार होऊ शकतो आणि आतापर्यंतच्या चांगल्या कामावर पाणी फेरू शकतं. त्यामुळे मला वाटतं लॉकडाऊन कमीत कमी आणखी 4 आठवडे असायला हवा. कोरोनाग्रस्तांची संख्या वाढते आहे त्यामुळे लॉकडाऊन हटवण्याची ही योग्य वेळ नाही. ग्रीन झोनमध्ये काही आर्थिक व्यवहार सुरू करता येतील मात्र आपल्याला खूप खबरदार राहायला हवं. मॉल्स, शाळा, कॉलेज, मार्केट मे महिना तरी बंद असावेत"

हे वाचा - Coronaविरोधी लढ्यात मुक्या जीवांची मदत, लवकरच कुत्रा ओळखणार कोरोनाग्रस्त व्यक्ती

विकसित देशांच्या तुलनेत भारत खूप चांगला लढा देत आहे. इतर देशांच्या तुलनेत भारतातील कोरोनाची प्रकरणं आणि मृत्यूदर कमी आहे. शिवाय भारतात प्रकरणं दुप्पट होण्याचा कालावधीही वाढला आहे आणि ही परिस्थिती कायम ठेवण्यासाठी आणि अधिक सुधारण्यासाठी आता रेड झोनमध्ये नियंत्रण रणनीतीवर लक्ष केंद्रीत केलं जातं आहे.

सरकारनं 9 राज्यातील 15 जिल्ह्यांची यादी काढली आहे, जिथं व्हायरसचं प्रमाण जास्त आहे. यामध्ये महाराष्ट्र, दिल्ली आणि गुजरातचा समावेश आहे.

नीती आयोगाच सीईओ अमिताभ कांत यांनी सोमवारी ट्विट केलं की, "आपल्या कोरोनाव्हायरविरोधातील लढ्यात हे 15 जिल्हे खूप महत्त्वाचे आहेत. त्यापैकी 7 जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक प्रकरणं आहेत. या जिल्ह्यात आपल्याला खूप चांगल्याप्रकारे तपासणी, नियंत्रण, चाचणी आणि उपचार करावे लागतील. आपल्याला इथं जिंकायचंच आहे."

संकलन, संपादन - प्रिया लाड

First published: April 30, 2020, 6:35 PM IST

ताज्या बातम्या