JOIN US
मराठी बातम्या / बातम्या / Coronavirus: 24 तासांत तब्बल 87 हजार लोकांना झाला कोरोना, मृत्यूचीही धक्कादायक आकडेवारी समोर

Coronavirus: 24 तासांत तब्बल 87 हजार लोकांना झाला कोरोना, मृत्यूचीही धक्कादायक आकडेवारी समोर

आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, 24 तासात 86961 नवीन प्रकरणे समोर आली आहेत तर 1130 लोकांचा मृत्यू झाला आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 21 सप्टेंबर : Coronavirus Cases in India Latest News Updates: देशात कोरोनाचा धोका कमी होण्याचं काही नाव घेत नाही. रोज मोठ्या संख्येने नव्या रुग्णांची भर होत आहे. गेल्या 24 तासातही कोरोनाच्या रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, 24 तासात 86961 नवीन प्रकरणे समोर आली आहेत तर 1130 लोकांचा मृत्यू झाला आहे. आता समोर आलेल्या नव्या आकडेवारीनुसार, कोरोनाची आतापर्यंतची एकूण सकारात्मक प्रकरणे 5,487,580 इतकी आहेत तर आतापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची संख्या 4396399 इतकी आहे. तर आतापर्यंत एकूण 87882 मृत्यू झाले आहेत. गनिमी कावा पद्धतीनं आंदोलन यशस्वी केल्यानंतर संदीप देशपांडेंची प्रतिक्रिया देशात कोरोनाचा धोका वाढत असला तरी रुग्ण बरी होण्याची टक्केवारी दिलासादायक आहे. रुग्ण बरे होण्याचा दर देशात 80.11 टक्के इतका आहे. नवे रुग्ण आढळणाऱ्या राज्यांमध्ये महाराष्ट्राचा देशात पहिला क्रमांक आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात 23 हजारांच्या आसपास नवे पेशंट आढळून येत आहेत. गर्भवती युवा वैद्यकीय अधिकारी महिलेचा मृत्यू, 5 दिवसांआधीच गमावलं होतं बाळ महाराष्ट्राबरोबरच कर्नाटक, आंध्र प्रदेश, तमिळनाडू आणि उत्तर प्रदेश या पाच राज्यांमध्ये देशातल्या कोरोनाबाधितांच्या संख्येपैकी 60 टक्के पेशंट आहेत. देशात कोरोना रुग्णांच्या संख्येने 52 लाखांचा आकडा पार केला आहे. तर मृत्यूची संख्या ही 85 हजारांवर पोहोचली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या