JOIN US
मराठी बातम्या / बातम्या / Corona Cases in India: एका दिवसात समोर आले 92 हजारांपेक्षा जास्त रुग्ण, मृतांचा आकडाही हजाराच्या वर

Corona Cases in India: एका दिवसात समोर आले 92 हजारांपेक्षा जास्त रुग्ण, मृतांचा आकडाही हजाराच्या वर

एकीकडे कोरोना संक्रमणाची गती वाढतच चालली आहे. पण दुसरीकडे कोरोना रुग्ण बरे होण्याची संख्याही दिलासादायक आहे.

जाहिरात

तर दिवसभरात 1 हजार 428 रुग्णांनी कोरोनावर मात केली.

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

Coronavirus Cases in India, नवी दिल्ली, 20 सप्टेंबर : देशात कोरोनाव्हायरस (Coronavirus) रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहेत. रोज मोठ्या संख्येनं रुग्ण समोर येत असल्याने नागरिकांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. अशात आजही कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. गेल्या 24 तासांमध्ये 92 हजार 605 नवीन कोरोनाची प्रकरणे नोंदवली गेली आहेत तर कोरोना संसर्गामुळे 1133 लोकांचा मृत्यू झाला आहे. आजच्या वाढलेल्या रुग्णांमुळे देशात कोरोना-संक्रमित रुग्णांची संख्या वाढून 54,00,619 वर पोहोचली आहे. शुक्रवारी बोलतांना देशात 93 हजार 337 नवीन प्रकरणे नोंदली गेली होती, तर 1247 रुग्णांना आपला जीव गमवावा लागला होता. देश अनलॉक होत असताना या राज्याने जाहीर केली संचारबंदी, 11 जिल्हे राहणार बंद आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, एकीकडे कोरोना संक्रमणाची गती वाढतच चालली आहे. पण दुसरीकडे कोरोना रुग्ण बरे होण्याची संख्याही दिलासादायक आहे. कोरोनाचे सध्या 10 लाख 10 हजार 824 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत, तर कोरोना संसर्गामुळे 86 हजार 752 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्याचबरोबर आतापर्यंत 43 लाख 3 हजार 43 लोक कोरोनामुळे बरेही झाले आहेत. दरम्यान, आयसीएमआरच्या म्हणण्यानुसार, देशात गेल्या 24 तासात 12,06,806 कोरोना तपासण्या केल्या गेल्या आहेत. तर आतापर्यंत 6,36,61,060 लोकांची कोरोना तपासणी झाली आहे. सुशांतची आत्महत्या की हत्या? आज एम्सच्या फॉरेन्सिक रिपोर्टनंतर होणार खुलासा दरम्यान, देशात कोरोनाची रुग्णांची सर्वाधिक संख्या ही महाराष्ट्रात आहे. राज्यात रोज मोठ्या संख्येनं लोकांना कोरोनाची लागण होत आहे. राज्यात दररोज आढळून येणाऱ्या नव्या रुग्णांची संख्या जास्त असतांनाच शनिवारी सलग दुसऱ्या दिवशी नव्या रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या ही जास्त आहे. शनिवारी दिवसभरात 23 हजार 501 रुग्ण कोरोनामुक्त झालेत तर 21 हजार 907 नवे रुग्ण आढळून आले आहेत. 24 तासांमध्ये 425 जणांचा मृत्यू झाला. बरे होणाऱ्या रुग्णांचं प्रमाण हे 72.22 टक्के एवढं झालं आहे. तर मृत्यूचं प्रमाण हे 2.71 टक्के एवढं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या