JOIN US
मराठी बातम्या / बातम्या / दिवा शहरात कोरोनाचा पहिला रुग्ण सापडल्याने खळबळ, संपूर्ण मुंब्रादेवी परिसर सील

दिवा शहरात कोरोनाचा पहिला रुग्ण सापडल्याने खळबळ, संपूर्ण मुंब्रादेवी परिसर सील

सध्या TMC अधिकाऱ्यांनी पूर्ण भाग सील करण्यासाठी घेतला असून रूग्णाच्या संपर्कात आलेल्या व्यक्तिंना त्वरित ठाण्यातील कोरंटाईन सेंटरला पाठवण्याची व्यवस्था केली आहे.

जाहिरात

कोरोना व्हायरसपासून बचाव करण्यासाठी आरोग्य कर्मचाऱ्यांना सध्या सक्तीनं N-95 मास्क वापरण्याची गरज आहे. जाणून घ्या काय आहेत या N-95 मास्कची विशेष वैशिष्ट्य...

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

दिवा, 12 एप्रिल : दिवा शहरात कोरोनाचा पहिला रुग्ण सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. मुंब्रादेवी कॉलनीत एक व्यक्ती पॉझिटिव्ह सापडली आहे. सदरच्या व्यक्तीला ताप आला असता 2 तारखेला उल्हासनगरला डॉक्टरकडे गेले असता त्यांना कोरोनासदृष्य लक्षण आढळून आल्याने ठाणे सिव्हील हॉस्पिटलला पाठवलं. पण आज या रुग्णाचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले असल्याची माहिती देण्यात आली आहे. सध्या TMC अधिकाऱ्यांनी पूर्ण भाग सील करण्यासाठी घेतला असून रूग्णाच्या संपर्कात आलेल्या व्यक्तिंना त्वरित ठाण्यातील कोरंटाईन सेंटरला पाठवण्याची व्यवस्था केली आहे. आमदार राजू पाटील आणि नगरसेवक रमाकांत मढवी यांनी संबंधीत अधिकाऱ्यांना संपूर्ण भाग डिसॅनीटाईज करायच्या सुचना केल्या आहेत व नागरीकांना घरातच थांबून प्रशासनास सहकार्य करण्याची विनंती केली आहे. दरम्यान, देशात कोरोना रुग्णांची संख्या वारंवार वाढत आहे. गेल्या 24 तासांत 34 मृत्यू आणि 909 नवीन घटना नोंदल्या गेल्या आहेत. भारतातील एकूण कोरोनाव्हायरस पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 8356 वर पोहोचली आहे (यामध्ये 7367 सक्रिय प्रकरणे, 716 बरे झाले/ निर्वासित / स्थलांतरित आणि 273 जणांचा मृत्यू )अशी माहिती आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने दिली आहे. कोरोनाचा धोका वाढतोय! 24 तासांत 909 नवीन पॉझिटिव्ह रुग्ण, देशातील आकडा 8,356 वर महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक कोरोना रुग्ण राज्यातला कोरोनाचा विळखा वाढतो आहे. आज मृतांची संख्या 127 एवढी झाली तर रुग्णांचा आकडा 1761वर गेलाय. तर आत्तापर्यंत 208 रुग्णांना सुट्टी देण्यात आली आहे. तर राज्यात आज एकाच दिवसांत 17 जणांचा मृत्यू झाला. तर 187 नवे रुग्ण सापडले. मृत्यूझालेल्या 17 जणांमध्ये तब्बल 12 जण मुंबईतले आहेत. तर पुण्यात 2 जणांचा मृत्यू झाला. तर सातारा, धुळे आणि मालेगावमध्ये प्रत्येकी 1 जण दगावला अशी माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. मृतांमध्ये पुरुषांचं प्रमाण जास्त असून ज्यांना डायबेटीज, ब्लडप्रेशर किंवा तर आजार आहेत अशांची मृतांमध्ये जास्त संख्या असल्याची माहितीही देण्यात आली आहे. कोरोनाचा महाराष्ट्रात प्रकोप वाढत आहे. लॉकडाऊनही वाढविण्यात आला आहे. त्या पार्श्वभूमीवर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज महत्त्वाची माहिती दिली. ते म्हणाले देशातच कोरोनाच्या रुग्णांची संख्या लक्षात घेऊन देशात ग्रीन, ऑरेंज आणि रेड झोन करण्याचे संकेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले आहेत. मुंबई, ठाणे, पुणे कोरोनाच्या रेड झोनमध्येच असतील. तिथे लॉकडाऊनचं कठोरपणे पालन करावं लागेल. हे पालन योग्य पद्धतीने झालं नाही तर लॉकडाऊन आणखी वाढवावा लागेल असा इशारा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिला. मेट्रो सिटींमध्ये त्याचं योग्य प्रकारे पालन होत नाही असंही ते म्हणाले. लॉकडाऊनमध्ये 12 तास रस्त्यावर होता मृतदेह, खिशात होत्या कोविडच्या टेस्ट स्लिप महाराष्ट्रात होणार पूल टेस्टिंग महाराष्ट्रात तीन प्रकारचे रुग्णालये असणार आहेत. सोम्य, मध्यम आणि तीव्र लक्षणे असणाऱ्या रुग्णांना त्या त्या प्रमाणात तिथे दाखल केलं जाणार आहे. मुंबई, ठाणे आणि पुणे हे रेड झोनमध्ये राहणार आहे. कारण एकूण रुग्णांमध्ये 91 टक्के हे याच भागात आहेत अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिलीत. महाराष्ट्रात पूल टेस्टिंग होणार असल्याचंही त्यांना सांगितलं. संकलन, संपादन- रेणुका धायबर

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Tags:

फोटो

महत्वाच्या बातम्या