मुंबई, 12 एप्रिल: भारतात कोरोना व्हायरस एप्रिल महिन्यात वेगानं वाढत असल्याचं पाहायला मिळत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार 24 तासांत 909 नवीन लोकांना कोरोनाची लागण झाल्याचं रिपोर्टमधून समोर आलं आहे. तर अद्यापही 2 हजार नागरिकांचे रिपोर्ट्स येणं बाकी आहे. धक्कादायक बाब म्हणजे 24 तासांत कोरोनामुळे 34 तर आतापर्यंत 273 लोकांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत भारतात रुग्णांची संख्या 8,356 वर पोहोचली आहे. त्यापैकी 7,367 जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 716 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. त्यामध्ये सर्वात लहान 6 वर्षांच्या चिमुकल्याचाही समावेश आहे.
पिछले 24 घंटों में कोरोना वायरस से 34 लोगों की मौत हुई है 909 नए मामले सामने आए हैं, भारत में कोरोना वायरस के मामलों की संख्या बढ़कर 8356 हो गई है(इसमें 7367 सक्रिय मामले, 716 ठीक/ डिस्चार्ज हो चुके मामले और 273 मौतें शामिल हैं): स्वास्थ्य और परिवार कल्याण मंत्रालय #COVID19 pic.twitter.com/C2Aw0dCxHW
— ANI_HindiNews (@AHindinews) April 12, 2020
शनिवारी कोरोनाग्रस्तांची संख्या 7 हजार 400च्या वर गेली होती. देशात 586 कोव्हिड हॉस्पिटल्स तयार झाले असून 1 लाख आयसोलेशन बेड्सही तयार असल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाचे सचिव लव अग्रवाल यांनी दिली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात आणखीन दोन आठवडे लॉकडाऊन वाढण्याची शक्यता आहे.