नवी दिल्ली, 05 सप्टेंबर : कॉंग्रेसचे आमदार निनोंग ईरिंग (Congress MLA Ninong Erring) यांनी केलेल्या धक्कादायक दाव्यानंतर एकच राजकीय खळबळ उडाली आहे. चिनी सैनिकांनी (PLA) अरुणाचल प्रदेशमधल्या 5 जणांचं अपहरण केल्याचा दावा निनोंग यांनी केला आहे. एका ट्वीटच्या माध्यमातून त्यांनी याचा खुलासा केला आहे. त्यांनी केलेल्या दाव्याची अद्याप कोणतीही पुष्टीकरण किंवा सविस्तर माहिती समोर आली नसून तपास सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. चीनला योग्य ते उत्तर द्या अशी मागणी करत निनोंग यांनी पंतप्रधान कार्यालयाला (PMO) ट्विटमध्ये टॅग केलं आहे. गेल्या चार महिन्यांपासून भारत आणि चीन यांच्या सीमेवर तणावाचं वातावरण आहे. त्यात या घटनेमुळे वाद आणखी चिघळण्याची शक्यता आहे. प्रेम प्रकरणातून घडली भयंकर घटना, भर रस्त्यातच पेटवून दिली रुग्णवाहिका काय लिहिलं आहे ट्विटमध्ये? चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीने (पीएलए) सुबासिरी जिल्ह्यात 5 जणांचं अपहरण केलं असल्याचं आमदार निनोंग ईरिंग यांनी लिहिले आहे. ‘धक्कादायक बातमी! आमच्या राज्या अरुणाचल प्रदेशातील सुबासिरी जिल्ह्यातील 5 जणांचं चिनी सैन्याने अपहरण केलं. अशीच एक घटना काही महिन्यांपूर्वी घडली होती. त्यामुळे चिनी कम्युनिस्ट पक्षाला चोख प्रत्युत्तर द्यायला हवं.’
कोरोना लसीसाठी आला नवा Covax प्लॅन, 18 सप्टेंबर ही नोंदणीची शेवटची तारीख कसं झालं अपहरण? दरम्यान, निनोंग यांनी ट्विट करताना अरुणाचल टाईम्स या स्थानिक वृत्तपत्राची बातमी शेअर केली आहे. यानुसार अपहरण केलेले 5 लोक टागीन समुदायाचे असल्याचं म्हटलं आहे. तर सगळीजण ही जवळच्या जंगलात शिकार करण्यासाठी गेले होते अशी माहिती समोर येत आहे. सिंगकम, प्रसाद रिंगलिंग, डोंगटू इबिया, तनु बेकर आणि नार्गु डिरी अशी अपहरण केलेल्या व्यक्तींची नाव असल्याचं सांगण्यात येत आहे. तर यातच दोनजण पळून जाण्यात यशस्वी झाले असल्याचंही सांगण्यात येत आहे.