नवी दिल्ली, 05 सप्टेंबर : कोरोनाचा वाढता प्रकोप आणि वाढती मृतांची संख्या लक्षात घेता जगात लवकर कोरोनाची लस (Coronavirus Vaccine) यावी असं प्रत्येकाला वाटत आहे. जेणेकरुन कोरोनाचा धोका टळेल आणि अनेकांचे जीव वाचतील. सर्व देशांची आरोग्य व्यवस्था ही कोरोनावर लस शोधण्यात व्यस्त आहे. पण त्यासाठी जागतिक आरोग्य संघटना (WHO) च्या नेतृत्त्वात तयार केलेल्या एका योजनेमध्ये कोरोनाची लस मिळवण्यासाठी तब्बल 76 श्रीमंत देशांनी सह्या केल्या आहेत. या योजनेंतर्गत कोरोना लस खरेदी करुन केली जाईल जेणेकरून प्रत्येकाला ही लस मिळू शकेल. ‘COVAX’ असं या योजनेचं नाव आहे. 76 देशांनी स्वाक्षर्या केल्या Gavi चे मुख्य कार्यकारी सेथ बर्कले यांनी दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत जपान, जर्मनी, नॉर्वेसह तब्बल 70 देशांनी या योजनेवर स्वाक्षरी केली आहे. अशात कोरोनाची लस संपूर्ण जगभर उपलब्ध होऊन त्यासाठी आणखी देश पुढे येतील अशी आम्हाला आशा असल्याचं बर्कले म्हणाले आहेत. बर्कले म्हणाले की ही चांगली बातमी आहे. यामुळे कोवाक्सकडे लोकांचं आकर्षण वाढत आहे असंही ते म्हणाले. दरम्यान, चीनने अद्याप या योजनेत भाग घेण्यासाठी सहमती दर्शविलेली नाही. पण कोरोनाचा धोका पाहता चीनही सोबत येईल आणि स्वाक्षरी करेन असं बर्कले यांनी म्हटलं आहे. ते पुढे म्हणाले की, आम्ही तिथल्या सरकारशी चर्चा करत आहोत. पण अद्याप सकारात्मक उत्तर आलेलं नाही. …म्हणून 2021 मध्येही कोरोनाचा प्रकोप असणार, रणदीप गुलेरिया यांनी दिली माहिती अमेरिकेचा या योजनेत सहभाग नाही कोरोनामुळे प्रत्येक देशाला मोठा फटका बसला आहे. त्यासाठी सर्व देश एकत्र येत कोरोनाच्या लसीवर काम करत आहेत. त्यासाठी ‘COVAX’ ही योजना आखली आहे. पण अमेरिकेचा या योजनेत सहभाग नाही. या योजनेत WHOचा सहभाग आहे, असं अमेरिकेचं म्हणणं आहे. त्यामुळे त्यांचा त्यात भाग होऊ शकत नाही. जगातील वेगवेगळ्या सरकारकडून कोविड -19 लस साठी प्रयत्न होत आहे. जिथे धोका मोठ्या प्रमाणात आहे ज्यांना या लसीची सगळ्यात जास्त आवश्यकता आहे अशा लोकांपर्यंत ही लस पोहोचवणं महत्त्वाचं आहे. प्रेमप्रकरणातून थेट रुग्णवाहिकाच पेटवली, emergency असतानाही तरुणांचं गंभीर कृत्य या योजनेमुळे सर्वांना कमी किंमतीत लस मिळेल आणि साथीच्या आजाराचा नाश करणं सोपं जाईल. JHUच्या आकडेवारीनुसार, कोरोनामध्ये आतापर्यंत 26,510,880 लोकांना संसर्ग झाला आहे आणि 832,569 लोक मरण पावले आहेत. काय आहे Covax चा हेतू? सर्व देशांसाठी ‘अमूल्य विमा पॉलिसी’ असं Covaxला WHO ने म्हटलं आहे. सुरक्षित आणि प्रभावी कोविड -19 लस येईल तेव्हा ती सर्वांपर्यंत पोहोचावी असा यामागचा उद्देश्य आहे. देशांना या योजनेत सामील होण्याची अखेरची तारीख 18 सप्टेंबर दिली आहे. COVAX अंतर्गत 2021 वर्षाच्या शेवटपर्यंस तयार करण्यात आलेल्या लसीच्या 2 अब्ज डोसची खरेदी आणि वितरण करता येणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.