चालकाला मारहाण करत भर रस्त्यात रुग्णवाहिका पेटवून दिल्याची घटना वर्ध्यामध्ये घडली आहे. प्रेमप्रकरणातून ही घटना घडल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
संघर्ष लोखंडे हा तीन युवकांसह रुग्णवाहिकेचा मालक तन्मय मेश्राम याच्या शोधात आला होता. घटनेच्या वेळी रुग्णवाहिका चालक रुग्ण आणण्यासाठी जात होत. मात्र सरकारी रुग्णालयाजवळ फोनवर चालक बोलत असतानाच संघर्ष लोखंडे आणि त्याचे सहकारी रुग्णवाहिकेत चढले आणि तन्मय मेश्रामबाबत विचारू लागले.
त्यावेळी तन्मय मेश्रामबाबत माहिती न मिळाल्याने संघर्ष आणि त्याच्या सहकाऱ्यांनी रुग्णवाहिका चालक कुंदन कोकाटेवर हल्ला केला आणि त्याच्यासह रुग्णवाहिका घेवून निघाले.
या कालावधीत संघर्ष लोखंडे याने साटोडा शिवारात नेलेल्या रुग्णवाहिकेला आग लावली. याप्रकरणी शहर पोलिसांनी दोन जणांना अटक केली आहे.