JOIN US
मराठी बातम्या / बातम्या / HSC मार्कशीट आणि शाळा सोडल्याचा दाखला देण्यासाठी मुंबईमध्ये शाळा उघडल्या...

HSC मार्कशीट आणि शाळा सोडल्याचा दाखला देण्यासाठी मुंबईमध्ये शाळा उघडल्या...

विद्यार्थ्यांना HSC 2020 मार्कशीट देण्यासाठी महाराष्ट्रातील अनेक महाविद्यालये व परिसरातील शाळा पुन्हा सुरू झाल्या आहेत.

जाहिरात

शिक्षकांकडून मार्गदर्शन, पुस्तकं किंवा इतर साहित्य घेण्यासाठी माध्यमिक शाळेतले विद्यार्थी पालकांच्या परवानगीने शाळेत शिक्षकांना भेटायला जाऊ शकतात.

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 02 ऑगस्ट : कोरोनाच्या संकटामुळे संपूर्ण जग ठप्प झालं आहे. राज्यातही कोरोनाचा शिरकाव झाला आणि मार्च महिन्यापासून शाळा, कॉलेज, ऑफिसं आणि व्यवसाय ठप्प झाले आहेत. अशात आता राज्य अनलॉकच्या तयारीत आहे. त्यामुळे मार्चमहिन्यामध्ये लागलेले शाळांचे टाळे आता उघडण्यास सुरुवात झाली आहे. विद्यार्थ्यांना HSC 2020 मार्कशीट देण्यासाठी महाराष्ट्रातील अनेक महाविद्यालये व परिसरातील शाळा पुन्हा सुरू झाल्या आहेत. शाळा सोडल्याचा दाखला फक्त शाळांकडून दिला जाईल. त्यामुळे शाळा, महाविद्यालयांतून फक्त गुणपत्रिका व शाळा सोडल्याचा दाखला देण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे. धक्कादायक! 3 युवकांनी कापला अपंग मुलाचा प्रायव्हेट पार्ट, प्रकृती नाजूक काही महाविद्यालयं विकेंडला सुरू होतील काही महाविद्यालये आठवड्याच्या शेवटी मार्कशीट आणि दाखला देण्यासाठी उघडणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. तर काही शाळांमध्ये आणि महाविद्यालयांमध्ये वेगवेगळ्या दिवशी मुलांना बोलावून मार्कशीट आणि दाखला देण्याची योजना आहे. पत्नीसह घरात आलेल्या पाहुण्याचीही केली निर्घृण हत्या, कोयत्याने केले सपासप वार मार्कशीट 4 ऑगस्टपर्यंत देण्यात येईल मार्कशीटची हार्ड कॉपी मुंबई विद्यापीठाने अद्याप अनिवार्य केलेली नाही, 31 जुलैला सेंट झेवियर्स कॉलेजमध्ये सुमारे 80 टक्के विद्यार्थ्यांना गुणपत्रिका देण्यात आल्या. शाळा 4 ऑगस्टपर्यंत ही प्रक्रिया सुरू ठेवेल अशी माहिती मुख्याध्यापकांकडून देण्यात आली आहे. दरम्यान, या वेळेत सोशल डिस्टंसिंग, मास्क आणि हात सॅनिटाईज करणं बंधनकारक आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या