पत्नीसह घरात आलेल्या पाहुण्याचीही केली निर्घृण हत्या, कोयत्याने केले सपासप वार

पत्नीसह घरात आलेल्या पाहुण्याचीही केली निर्घृण हत्या, कोयत्याने केले सपासप वार

ही घटना काल रात्रीच्यावेळी घडली आहे. यवत पोलिसांनी आरोपीला तात्काळ अटक केली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.

  • Share this:

सुमित सोनवणे, प्रतिनिधी

दौंड, 31 जुलै : दौंड तालुक्यातील खुटबाव इथल्या मटकाळा हद्दीत निर्जनस्थळी असणाऱ्या एका झोपडीत अज्ञात कारणावरुन आरोपीने पत्नी आणि एक नातेवाईक असा दोन जणांचा कोयता आणि बांबूने मारहाण करीत निघृणपणे  खून केला आहे. ही घटना काल रात्रीच्यावेळी घडली आहे. यवत पोलिसांनी आरोपीला तात्काळ अटक केली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.

खुटबाव गावच्या हद्दीत असणाऱ्या नवा मुठा उजवा कालव्यानजीक हे आदिवाशी कुटूंब एका पालासारख्या झोपडीत वास्तव्यात आहे. गुरूवारी या कुटूंबात मंगेश जाधव हा पाहूणा मुक्कामी आला होता. त्यांच्यात रात्री कोणत्यातरी कारणाने भांडण झाले होते. याच कारणाने  चिडलेल्या आरोपीने त्याची पत्नी आणि पाहुण्याचा बांबू आणि कोयत्याने खून केला आहे.

या दोन स्मार्टफोनवर आज आहे मोठा सेल, flipkartवर बंपर ऑफरला सुरुवात

आज घटनेची माहिती मिळताच दौंड उपविभागीच पोलीस अधिकारी ऐश्वर्या शर्मा यांनी घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली आहे.अधिक तपास यवत पोलीस ठाण्याचे पोलिस निरिक्षक भाऊसाहेब पाटील हे करत असून त्यांनी आरोपीला अटक केली असल्याची माहिती देण्यात आली आहे.

रक्ताच्या नात्येनं अंत्यसंस्काराला दिला नकार, सरपंचाने दिला माणूसकीचा आदर्श

मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत झोपडीतून दोन जणांचा मृतदेह ताब्यात घेतला असून तो शवविच्छेदनासाठी नजिकच्या स्थानिक रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण आहे तर हत्येचं नेमकं कारण शोधण्यासाठी पोलीस चौकशी करत असल्याची माहिती देण्यात आली आहे.

Published by: Renuka Dhaybar
First published: July 31, 2020, 3:52 PM IST

ताज्या बातम्या