मुंबई,ता,2 जुलै : नवी मुंबईतल्या भूखंड घोटाळ्याचे सर्व आरोप भाजपने फेटाळले आहेत. भाजपचे प्रवक्ते माधव भांडारी आणि आमदार प्रसाद लाड यांनी पत्रकार परिषद घेऊन सर्व आरोप फेटाळून लावले. नवी मुंबईतली जमीन ही सिडकोची असल्याचा आरोप काँग्रेसने केला होता, मात्र ही जमीन राज्य सरकारची असल्याचं स्पष्टीकरण भांडारी यांनी दिलं. कोयना प्रकल्पग्रस्तांना जमीन दिली होती, त्यानंतर स्थानिक नागरिक कोर्टात गेले होते, कोर्टाने स्थानिक नागरिकांच्या विरोधात निर्णय दिला. प्रकल्पग्रस्तांना जमीनीचं वाटप हे जिल्हाधिकारी कार्यालय करतं, मुख्यमंत्र्यांचं ऑफिस नाही असंही भांडारी यांनी सांगितलं.
काँग्रेस कार्यकाळत १५० जणांना जमीन दिली
जमीन वाटपात गैरप्रकार झालेला नाही, काँग्रेस फक्त आरोपांचा खेळ काँग्रेस करत आहे. काँग्रेसला राज्य सरकारला कोंडीत पकडतां येत नाही त्यामुळे काँग्रेस चिखलफेक करत, पोरकट आरोप करण्यापेक्षा जनतेचं काम काँग्रेस पक्षाने करावे असा सल्लाही भांडारी यांनी दिला. 1970 पासून काँग्रेसने ज्या जमीनींचं वाटप केलं त्यांचीही चौकशी करा असं काँग्रेस सांगणार का असा सवालही त्यांनी केला.
प्रसाद लाड यांचं स्पष्टीकरण संजय निरूपम भरकटलेले नेते आहे. मनिष भतिजा, भालेराव यांच्या सोबतचे फोटो दाखवून काँग्रेसने जे आरोप केले त्यात काहीही तथ्य नाही. जे फोटो दाखवले त्यावरून ते माझे पार्टनर आहे हे सिद्ध होत नाही. काँग्रेस पक्ष, संजय निरूपम, पृथ्विराज चव्हाण आणि रणदीप सुरजेवाला यांवर वैयक्तिक ५०० कोटी अब्रूनुकसानी दावा टाकणार असल्याचा इशाराही प्रसाद लाड यांनी दिला