JOIN US
मराठी बातम्या / बातम्या / प्रसिद्ध इंग्लिश गाणं गातोय भिकारी, सोशल मीडियावर VIDEO चा धुमाकूळ

प्रसिद्ध इंग्लिश गाणं गातोय भिकारी, सोशल मीडियावर VIDEO चा धुमाकूळ

भिकारी इंग्लिश गाणं गात असताना व्हिडिओ शूट करणाऱ्याने इंग्लिशमध्ये विचारलं की, ‘जगण्यासाठी तू काय करतोस?’ याशिवाय इतर प्रश्नांची उत्तरंही त्यानं दिली.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 22 एप्रिल : अनेकदा कलाकारांना योग्य व्यासपीठ मिळत नाही आणि त्यांच्यातली कला हरवून जाते. काही लोक असेही असतात की त्यांना कोणत्याही व्यासपीठाची गरज नसते. ते कधीही कुठंही आपली कला सादर करतात. त्यांच्यातले कलागुण लपून राहत नाहीत. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये एक भिकारी प्रसिद्ध असं इंग्लिश गाणं गाताना दिसत आहे. बिहारची राजधानी पटना इथला हा व्हिडिओ असल्याचं म्हटलं जात आहे. हा याआधीही भिकारी असलेल्यांचे इंग्लिश बोलत असलेले व्हिडिओ व्हायरल झाले आहेत पण असा गाणं म्हणणारा व्हिडिओ पहिलाच असावा.इंग्लिश गाणं म्हणणाऱ्या या व्यक्तीचा व्हिडिओ सोमवारी सोशल मीडियावर व्हायरल झाला.

दोन-अडीच मिनिटांचा हा  व्हिडिओ वंदना जयराजन यांनी ट्विटरवर शेअर केला आहे. यामध्ये भिकारी जिम रिव्सचं प्रसिद्ध गाणं ‘He’ll Have to Go’ गात असताना दिसते. जिम रिव्स या अमेरिकन गायकाने हे गाणं 1959 मध्ये गायलं होतं. 1960 च्या दशकात हे गाणं प्रचंड लोकप्रिय होतं. हे वाचा : TikTok वर आतापर्यंतचा सर्वात डेंजर VIDEO, युजर्सही प्रचंड घाबरले व्हिडिओ शूट करणाऱ्याने भिकाऱ्यासोबत संवादही साधला आहे. यात इंग्लिशमधून काही प्रश्न विचारले त्यावर उत्तरही दिलं. भिकाऱ्याला विचारलं की, दररोज जगण्यासाठी तु काय करतोस असा प्रश्न विचारला त्यावर भिकाऱ्यानं क्षणार्धात मी भीक मागतो असं उत्तर दिलं. याशिवाय त्याला जेवणाबद्दल विचारलं तर सध्याच्या कठीण परिस्थितीतही काहीच तक्रार त्याने केली नाही. तो म्हणाला की जे काही देव मला देतो त्यात मी आनंदी आहे. मी एक गायक आणि डान्सर आहे. माझं नाव सनी बाबा आहे. हे वाचा : लॉकडाऊनमध्ये घरातलं तांदूळ संपलं म्हणून जंगलातून किंग कोब्रा मारून आणला संपादन - सूरज यादव

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या