मुंबई, 28 जून: बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अभियांत्रिकी सेवा व प्रकल्पाच्या संचालकपदी पहिल्यांचा एका महिलेची नियुक्ती करण्यात आली आहे. महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी अभियंता श्रीमती अर्चना आचरेकर यांची संचालक या पदावर नुकतीच नियुक्ती केली आहे. सोबतच त्यांच्याकडे पादचारी पुल, घनकचरा व्यवस्थापन असे महत्त्वाचे प्रकल्प देण्यात आले आहेत. हेही वाचा… जे बोलले ते करुन दाखवलं, मोदींसारख्या कणखर नेतृत्वात देश सुरक्षित – फडणवीस अर्चना आचरेकर या 1984 पासून म्हणजे गेल्या 36 वर्षांपासून त्या महानगरपालिकेच्या सेवेत आहेत. महापालिकेत महत्त्वाची खाती महिलांकडे सुपूर्द केली असल्याने आता महापालिकेतही आता महिला राज असल्याचं पाहायला मिळत आहे. दरम्यान, अभियांत्रिकी सेवा व प्रकल्प विषयक संचालकपदी महापालिकेच्या इतिहासात प्रथमच श्रीमती अर्चना आचरेकर याच्या रुपात एका महिलेची नियुक्ती झाली आहे. यापूर्वी श्रीमती आचरेकर या महानगरपालिकेच्या सिटी इंजिनिअर म्हणून कार्यरत होत्या. श्रीमती आचरेकर यांची संचालकपदी नियुक्ती झाल्यामुळे प्रथमच या पदावर एक ज्येष्ठ महिला अधिकारी विराजमान झाल्या आहेत. **हेही वाचा…** जुळ्या झाल्या, सांभाळायच्या कशा? या विवंचनेतून आईनंच पाण्याच्या टाकीत बुडवलं विविध पदांवरील कामाचा अनुभव… श्रीमती आचरेकर या जानेवारी 1984 मध्ये महानगरपालिकेच्या सेवेत दुय्यम अभियंता म्हणून रुजू झाल्या होत्या. महानगरपालिकेतील आपल्या सेवेच्या काळात त्यांनी विविध खात्यातील विविध पदांवर काम केले आहे. मुंबईतील ‘वीरमाता जिजाबाई टेक्नॉलॉजिकल इन्स्टिट्यूट’ येथून श्रीमती आचरेकर यांनी अभियांत्रिकीची पदवी प्राप्त केली आहे. दरम्यान, अर्चना आचरेकर यांच्याकडे महापालिकेचे महत्त्वाचे प्रकल्प हाताळ्याची संधी देण्यात आली आहे.