JOIN US
मराठी बातम्या / बातम्या / 'कोणाचा बँड वाजतो तर कोणाचा ब्रँड....' 'ठाकरे'ब्रँड वरून मनसेची पुन्हा एकदा जहरी टीका

'कोणाचा बँड वाजतो तर कोणाचा ब्रँड....' 'ठाकरे'ब्रँड वरून मनसेची पुन्हा एकदा जहरी टीका

संदीप देशपांडे यांच्यानंतर अमेय खोपकर यांनीही ट्वीट करत नाव न घेता शिवेसना संजय राऊत आणि सीएम उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 14 सप्टेंबर : कंगना विरुद्ध शिवसेना वादात आता ठाकरे ब्रँडवरूही राजकारण सुरू झालं आहे. संजय राऊतांनी ठाकरे ब्रँडवरून केलेल्या वक्तव्यानंतर मनसे पेटून उठली आहे. ठाकरे ब्रँड सांभाळण्यासाठी राज ठाकरे समर्थ आहेत अशी टीका मनसे सरचिटनीस संदीप देशपांडे यांनी केल्यानंतर आज पुन्हा एकदा यावर त्यांनी टीका केली आहे. इतकंच नाही तर संदीप देशपांडे यांच्यानंतर अमेय खोपकर यांनीही ट्वीट करत नाव न घेता शिवेसना संजय राऊत आणि सीएम उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. ‘विचार,संयम’ स्वाभिमान या मुळे “ब्रॅण्ड"मजबूत होत असतो. या उलट तडजोड, लाचारी यामुळे व्यवसाय तर होतो पण ब्रॅण्ड रसातळाला जातो’ अशा शब्दात संदीप देशपांडे यांनी ट्वीट करत शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना खोचक टोला लगावला आहे. तर यावर मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनीही जोरदार टीका केली आहे.

‘कोणी घरी बसतो, कोणी उरी बसतो, कोणाचा बॅंड वाजतो, कोणाचा ब्रॅंड गाजतो!’ असं ट्वीट करत अमेय खोपकर यांनी संजय राऊतांना सणसणीत उत्तर दिलं आहे. दरम्यान, संजय राऊतांनी केलेल्या या वक्तव्यानंतर मनसैनिक पेटून उठले आहेत. रविवारी या प्रकरणात अनेक मनसे नेत्यांनी उडी घेत शिवसेना आणि राऊतांवर टीका केली. खरंतर, संजय राऊत यांनी सामानातून ठाकरे ब्रँडचा विषय काढत राज ठाकरे यांच्याशी जवळीक करण्याचा प्रयत्न केला. पण त्यानंतर मनसेकडून मात्र सेनेवर टीका केली जाणारी प्रतिक्रिया दिली जात आहे.

संबंधित बातम्या

काय म्हणाले राऊत? शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या दैनिक सामनाच्या रोखठोक सदरात संजय राऊत यांनी भाजपवर सडकून टीका केली. यावेळी त्यांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याबद्दलही चिंता व्यक्त केली. ‘ठाकरे’ हा महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा एक ब्रॅण्ड आहे. दुसरा महत्त्वाचा ‘ब्रॅण्ड’ पवार नावाने चालतो आहे. मुंबईतून या ब्रॅण्डनाच नष्ट करायचे व त्यानंतर मुंबईवर ताबा मिळवायचा हे कारस्थान पुन्हा उघडे पडले आहे. राज ठाकरे हेसुद्धा त्याच ‘ब्रॅण्ड’चे एक घटक आहेत व या सगळ्याचा फटका भविष्यात त्यांनाही बसणार आहे. शिवसेनेबरोबर त्यांचे मतभेद असू शकतात, पण शेवटी महाराष्ट्रात ‘ठाकरे’ ब्रॅण्डचा जोर असायला हवा. ज्या दिवशी ‘ठाकरे’ ब्रॅण्डचे पतन होईल त्या दिवसापासून मुंबईचे पतन व्हायला सुरुवात होईल’ अशी चिंताही राऊतांनी व्यक्त केली.

जाहिरात

यावर मनसेच्या नेत्या शालिनी ठाकरे यांनी एका VIDEOच्या माध्यमातून राऊतांना उत्तर दिलं. ठाकरे हा ब्रँड कोण जपतंय हे साऱ्या जगाला माहीत आहे असं त्यांनी म्हटलं होतं. शालिनी ठाकरे यांनी ट्विटरवर हा VIDEO पोस्ट केला होता. त्यात त्यांनी बाळासाहेब ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यातली साम्यस्थळं दाखवली. त्यातून राज ठाकरे हेच बाळासाहेबांचा वारसा चालवत आहेत असं त्यांनी सूचवलं. व्यंगचित्रकार, गर्दी खेचणारा नेता आणि प्राण्यांवर प्रेम गुण विशेष बाळासाहेब आणि राज ठाकरे या दोघांमध्येही आहे असं व्हिडीओत दाखविण्यात आलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या