JOIN US
मराठी बातम्या / देश / वकिलाने कोर्टातच सजवला लग्नाचा मंडप अन्..., नेमकं काय घडलं? पाहा VIDEO

वकिलाने कोर्टातच सजवला लग्नाचा मंडप अन्..., नेमकं काय घडलं? पाहा VIDEO

एका वकिलाने कोर्टातच लग्नाचा मंडप सजवला.

जाहिरात

घटनास्थळाचा फोटो

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

शक्ति सिंह, प्रतिनिधी कोटा, 17 जून : राजस्थानच्या कोटा येथील न्यायालयाच्या आवारात झालेल्या एका अनोख्या विवाहाची सध्या मोठी चर्चा होत आहे. न्यायालयात तर कोर्टा मॅरेज केले जाते. मात्र, न्यायालयाच्या आवारात एका वकिलाने हवनकुंड बांधले. यानंतर पंडित यांना बोलावून मंत्रोच्चार करून तरुण व तरुणीचे लग्न लावले. तसेच लग्नाच्या शूटिंगसाठी फोटोग्राफरलाही बोलावण्यात आले होते. त्याने लग्नाचे व्हिडिओ कव्हरेज केले. वकील परिषदेच्या अध्यक्षांना कोर्टात या विवाहाची माहिती मिळताच त्यांनी बैठक आयोजित करून विवाह संचलन करणारे वकील मनोज जैन यांची परिषदेतून हकालपट्टी केली. वकील परिषदेचे महासचिव गोपाल चौबे यांनी सांगितले की, बुधवारी दुपारी 1 ते 2 या वेळेत ही घटना घडली. कँटीनजवळील वकिलांच्या चेंबरच्या गॅलरीत वकील मनोज जैन यांनी न्यायालयाच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचवण्याचे कृत्य केले. मनोज जैन यांनी गॅलरीत हवन कुंड तयार करुन जोडप्याचे लग्न लावून दिले.

तसेच त्यांनी या लग्नासाठी पंडितजींना बोलावले तसेच फोटोग्राफरही बोलावला होता. उन्हाळ्यात सकाळचे न्यायालय असते. बहुतेक वकील 1 वाजेपर्यंत घरी जातात. तर काही वकील त्यांच्या कामासाठी कोर्टात थांबतात. तर घटनेच्या वेळी उपस्थित असलेल्या वकिलांनी मनोज जैन यांना अडवले. मात्र, मनोज जैन यांनी शिवीगाळ केली. एका वकिलाने एक छोटा व्हिडिओ बनवला. ही बाब निदर्शनास आल्यानंतर वकील परिषदेची बैठक झाली. वकील मनोज जैन यांची परिषदेच्या सदस्यत्वातून हकालपट्टी करण्यात आली.

वकील परिषदेचे अध्यक्ष प्रमोद शर्मा यांनी सांगितले की, बुधवारी दुपारी न्यायालयाचा परिसर रिकामा होता. मनोज जैन यांनी वकिलांना बसण्यासाठी बनवलेल्या चेंबरच्या गॅलरीत हवन करून पंडितजींच्या माध्यमातून मंत्रोच्चार करून तरुणीचे लग्न लावून दिले. दरम्यान, मनोज जैन यांची परिषदेतून हकालपट्टी करण्यात आली आहे. त्यांना करारावर मिळणाऱ्या लाभापासून वंचित ठेवले. मनोज जैन यांचीही तक्रार राजस्थान बार कौन्सिलमध्ये करण्यात येणार आहे. दुसरीकडे लग्न झालेल्या तरुण-तरुणीची माहिती अद्याप मिळालेली नाही.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या