JOIN US
मराठी बातम्या / देश / देशातल्या सर्व पोलिसांचा गणवेश खाकी, पण कोलकाता पोलीस पांढरा गणवेश का वापरतात?

देशातल्या सर्व पोलिसांचा गणवेश खाकी, पण कोलकाता पोलीस पांढरा गणवेश का वापरतात?

खाकी रंगावरून पोलिसांची ओळख होते.

जाहिरात

file photo

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

कोलकाता, 14 एप्रिल : पोलिसात भरती होण्याचं अनेकांचं स्वप्न असतं. काही जण हे स्वप्न पूर्ण करतात तर काहींच फक्त स्वप्नचं राहतं. अगदी बीग बी अमिताभ बच्चनपासून ते रणवीरसिंहपर्यंत अनेक मोठ्या कलाकारांनाही पोलिसांच्या खाकी वर्दीने भुरळ पाडलेली आहे. जवळजवळ प्रत्येक मोठा अभिनेता कधी ना कधी पोलिसांच्या भूमिकेत दिसला आहे. पोलिसांच्या खाकी गणवेशाचा एक वेगळाच रुबाब असतो; पण तुम्हाला माहिती आहे का, की भारतातल्या पोलिसांचा गणवेश खाकी रंगाचाच का असतो? शिवाय फक्त कोलकाता शहरातले पोलीस पांढऱ्या रंगाचा गणवेश का घालतात? या प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊ या. खाकी रंगावरून पोलिसांची ओळख होते. हा रंग कसा निवडला गेला, यामागेही मोठा इतिहास आहे. इंग्रज भारतात आले तेव्हा त्यांनी पोलीस खात्यासाठी पांढरा गणवेश ठरवला होता. तो दिसायला चांगला दिसत होता; पण एक मोठी अडचण म्हणजे तो खूप लवकर खराब होत असे. घाणेरडा गणवेश घालणं हे बेशिस्तीचं लक्षण मानलं जात होतं. त्यामुळे ब्रिटिश अधिकाऱ्यांनी त्यांचा गणवेश डाय करण्यास सुरुवात केली. त्या काळी कपड्यांना डाय करण्यासाठी चहाच्या पानांचा वापर केला जात होता. त्यामुळे पांढऱ्या गणवेशाचा रंग फिकट पिवळा किंवा तपकिरी होत असे. 1847मध्ये जेव्हा वायव्य सरहद्दीच्या गव्हर्नर जनरलने खाकी गणवेश घातलेल्या एका सैनिकाला पाहिलं तेव्हा त्यांनी पोलिसांच्या गणवेशासाठी खाकी हाच रंग निवडला. तेव्हापासून पोलीस खाकी रंगाचा गणवेश वापरू लागले. आता भारतातल्या प्रत्येक राज्यातले पोलीस खाकी गणवेश घालतात; मात्र कोलकाता पोलीस अद्याप पांढरा गणवेश घालतात. हॉटेलमध्ये गर्लफ्रेंडसोबत पोहोचला नवरा, बायकोला माहिती झालं अन् मग काय, लोक पाहतच राहिले! कोलकाता पोलिसांचा गणवेश पांढरा का? पश्चिम बंगालमधल्या इतर जिल्ह्यांमधले पोलीसही खाकी रंगाचे कपडे घालतात. फक्त कोलकाता शहरातले पोलीस पांढरे कपडे घालतात. कोलकाता पोलीस आणि बंगाल पोलीस ही दोन वेगळी पोलीस दलं आहेत. 1861मध्ये ब्रिटिश राजवटीत बनवलेल्या नियमांनुसार कोलकाता पोलीस दल राज्य पोलिसांपेक्षा वेगळं होतं. ही पोलीस व्यवस्था फक्त शहराला लागू होती. त्यामुळे कोलकाता पोलिसांचा पोशाख त्यांच्या खास ओळखीसाठी वेगळा ठेवण्यात आला होता. कोलकाता पोलीस आजही ब्रिटिशकालीन जुन्या ड्रेस कोडचं पालन करतात. अनेक रिपोर्ट्समध्ये असाही दावा करण्यात आला आहे, की कोलकात्यात खूप उष्णता असते. पांढऱ्या गणवेशामुळे पोलिसांना उकाड्यापासून थोडा दिलासा मिळतो.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या