JOIN US
मराठी बातम्या / देश / सौंदर्य ठरलं मृत्यूचं कारण; मत्सरातून तरुणीचे केस-भुवया कापून शरीरावर केले 33 वार मग...

सौंदर्य ठरलं मृत्यूचं कारण; मत्सरातून तरुणीचे केस-भुवया कापून शरीरावर केले 33 वार मग...

मत्सरातून अमानवी हत्या, केस आणि भुवया कापूण, तिच्या शरीरावर चटके देत 33 वेळा वार केले. अखेर तरुणीचा मृत्यू झाला.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

विशाखापटन्नम, 09 जून : सौंदर्य हे स्त्रीकडे जन्मजात असलेले अलंकार मानले जाते. मात्र एका 22 वर्षीय तरुणीसाठी तिचं सौंदर्य जीवघेणं ठरलं. आंध्र प्रदेशातील विशाखापटन्नम येथं मन सुन्न करणारी घटना घडली. इथं भाड्याच्या घरात एकट्या राहणाऱ्या 22 वर्षीय दिव्यावर घरमालकिणीनं वेश्या व्यवसायासाठी छळ केला. घरमालकिणीला दिव्या दिसायला सुंदर असल्यामुळं तिच्याबद्दल मत्सर निर्माण झाला. यातून तिनं अमानवीरित्या दिव्याला त्रास दिला, यातच तिचा मृत्यू झाला. या घरमालकिणीनं रागात दिव्याचे केस आणि भुवया कापल्या, तिच्या शरीरावर चटके देत 33 वेळा वार केले, तिला उपाशी ठेवलं. 5 दिवस पोटात अन्न-पाण्याचं कण नसल्यामुळं दिव्याचा मृत्यू झाला. दिव्याचा मृत्यू झाल्याचं कळल्यानंतर घरमालकिणीनं तिच्या मृतदेहाची विल्हेवाट लावली. या अमानवी घटनेनं सर्वत्र खळबळ उडाली आहे. रविवारी पोलिसांनी आंध्र प्रदेशातील विशाखापटन्नमच्या खळबळजनक दिव्या मर्डर प्रकरणातील 6 आरोपींना अटक केली. 22 वर्षांच्या मुलीवर निर्दयपणे अत्याचार करून तिचा खून केल्याच्या अमानवी प्रकरणाचा पोलिसांनी छडा लावला. वाचा- 3 हॉस्पिटलने नाकारले, एकाने मागितले लाख रुपये, गर्भवती महिलेची वेदनादायी कहाणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिव्या मर्डर प्रकरणातील मुख्य आरोपी ही घरमालकिण गुताला वसंत आहे. तिनेच दिव्याला वेश्या व्यवसायात ढकलण्यासाठी अत्याचार केले आणि छळ करून तिची हत्या केली होती. 4 जून रोजी 22 वर्षीय मुलीच्या संशयास्पद स्थितीत पोलिसांना मृतदेह सापडला. जेव्हा आरोपी मृतदेहाची विल्हेवाट लावत होते तेव्हा पोलिसांना ही माहिती मिळाली. याबाबत जेव्हा पोलिसांनी मालकिणीची चौकशी केली तेव्हा तिनं दिव्याचा आजारपणामुळे मृत्यू झाल्याचं सांगितलं. नंतर पोस्टमार्टम रिपोर्ट आले तेव्हा दिव्याच्या शरीरावर 33 जखमा झाल्याचे आढळले. आरोपी महिला आणि तिच्या सहकाऱ्यांनी दिव्याचा मृतदेह फुलांनी झाकला होता आणि रात्री ते अंत्यसंस्कार करण्याचा विचार केला. मृतदेह अंत्यसंस्कारासाठी घेऊन जात असताना वाहन चालकाला संशय आला आणि त्यानं पोलिसांना कळवले. वाचा- पिंपरी चिंचवड हादरलं, प्रेम करण्याच्या संशयावरून तरुणाची निर्घृण हत्या पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वसंता दिव्याला वेश्या व्यवसाय करण्यासाठी भाग पाडत होती. दिव्या सुंदर असल्याचाही वसंताला राग होता. 2015मध्ये काही अज्ञात लोकांनी दिव्याची आई, भाऊ आणि आजीचीही हत्या केल्याचं पोलिसांना तपासात आढळले, ज्याची चौकशी चालू आहे. दरम्यान, आता याप्रकरणी पोलिसांनी वसंता, तिची बहीण मंजू उर्फ ​संध्या, आई धनलक्ष्मी, मेहुणे संजय आणि वसंताची मावशी कांतीवेनी यांना अटक केली आहे. त्यांच्याविरोधात भादंवि कलम 302, 343, 324, 326 आणि बेकायदेशीर ह्युमन ट्रॅफिकिंग 201 आणि 294 नुसार गुन्हा दाखल केला आहे. वाचा- लेकीनं धरला प्रियकरासोबत लग्नचा हट्ट, आई-वडिलांना गर्भवती मुलीची केली हत्या संपादन, संकलन-प्रियांका गावडे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या