जाहिरात
मराठी बातम्या / देश / सैराट पॅटर्न! लेकीनं धरला प्रियकरासोबत लग्न करण्याचा हट्ट, आई-वडिलांना गर्भवती मुलीचीच केली हत्या

सैराट पॅटर्न! लेकीनं धरला प्रियकरासोबत लग्न करण्याचा हट्ट, आई-वडिलांना गर्भवती मुलीचीच केली हत्या

सैराट पॅटर्न! लेकीनं धरला प्रियकरासोबत लग्न करण्याचा हट्ट, आई-वडिलांना गर्भवती मुलीचीच केली हत्या

लेक 13 आठवड्यांची गरोदर असल्याचं कळल्यानंतर आई-वडिलांना धक्का बसला आणि त्यांनी तिला गर्भपात करण्यास सांगितलं.

  • -MIN READ
  • Last Updated :

हैदराबाद, 09 जून : एकीकडे देशावर कोरोनाचं संकट असताना दुसरीकडे अजूनही ऑनर किलिंगचे बळी जात आहेत. तेलंगणामध्ये असाच एक धक्कादायक प्रकार घडला. तेलंगणाच्या जोगुलंबा गडवाल जिल्ह्यातील काळुकुंटला गावात एका मुलाशी लग्न करण्याची हट्ट धरला म्हणून आई-वडिलांनीच मुलीची हत्या केली. शांतीनगरचे सर्कल इन्स्पेक्टर वेंकटेश्वरलु यांनी दिलेल्या माहितीत, दिव्या (18) ही भास्करैया याची तिसरी मुलगी आहे. दिव्या आंध्र प्रदेशातील कुरनूल शहरातील सेंट जोसेफ कॉलेजमध्ये द्वितीय वर्षात शिकत होती. तिथेच ती कोडुमुरु येथे राहणाऱ्या एका मुलाच्या प्रेमात पडली. काही दिवसांनी दिव्याची तब्येत बिघडल्यामुळं तिला पालकांनी रुग्णालयात नेले. तेव्हा त्यांना दिव्या गर्भवती असल्याचं कळलं. दिव्या 13 आठवड्यांची गरोदर असल्याचं कळल्यानंतर आई-वडिलांना धक्का बसला आणि त्यांनी दिव्याला गर्भपात करण्यास सांगितलं. दिव्यानं मात्र गर्भपात करण्यास नकार देत, प्रियकराबरोबर लग्न करण्याचा आग्रह धरला. वाचा- कोर्टात याचिका दाखल करून दुबईहून भारतात आली गर्भवती महिला, पतीचा मृत्यू सीआयने सांगितले की पालकांनी तिच्या लग्नाला होकार दिला आणि तिला घरी घेऊन आले. मात्र त्याच दिवशी दिव्याची हत्या केली. दिव्याच्या आई-वडिलांनी कट रचत ही हत्या केली. मध्यरात्री भास्करैयानं दिव्या झोपली असताना तिच्या तोंडावर उशी दाबून तिची हत्या केली. वाचा- पिंपरी चिंचवड हादरलं, प्रेम करण्याच्या संशयावरून तरुणाची निर्घृण हत्या दरम्यान, रविवारी भास्करैयानं आपल्या मुलीचा नैसर्गिक मृत्यू झाल्याचं गावकऱ्यांना सांगितलं. ग्रामसचिवांना हत्येचा संशय आला, म्हणून त्यांनी पोलिसांत तक्रार केली. त्यानंतर पोलिसांनी केलेल्या तपासात सत्य समोर आले. संपादन, संकलन-प्रियांका गावडे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात