JOIN US
मराठी बातम्या / देश / 'वंदे भारत एक्सप्रेस'मधील जेवणात निघालं झुरळ, रेल्वेनं दिलं स्पष्टीकरण

'वंदे भारत एक्सप्रेस'मधील जेवणात निघालं झुरळ, रेल्वेनं दिलं स्पष्टीकरण

या प्रवाशाने व्हिडीओ करुन रेल्वे मंत्र्यांना तक्रार दाखल केली. त्यानंतर रेल्वेकडून या प्रकरणी स्पष्टीकरण देण्यात आलं आहे.

जाहिरात

झुरळ

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 28 जुलै : व्हीआयपी ट्रेन म्हणून वंदे भारत ट्रेनकडे पाहिलं जातं. मात्र याच वंदे भारत ट्रेनमधील जेवणात झुरळ आढळल्याने खळबळ उडाली आहे. एका प्रवाशाने मागवलेल्या पराठ्यामध्ये झुरळ आढळल्याने खळबळ उडाली आहे. या प्रवाशाने व्हिडीओ करुन रेल्वे मंत्र्यांना तक्रार दाखल केली. त्यानंतर रेल्वेकडून या प्रकरणी स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. प्रवाशाने रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव आणि रेल्वेकडे ट्विट करून तक्रार केली आहे. त्यानंतर आयआरसीटीसीने कारवाई करत जेवण देणाऱ्याला मोठा दंड ठोठावला आहे. तसेच भविष्यात अशा घटना घडणार नाहीत, असं आश्वासनही दिलं आहे.

सुबोध नावाच्या प्रवाशाने सांगितले की, तो २४ जुलै रोजी राणी कमलापती स्थानकातून हजरत निजामुद्दीनला जाणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेस (ट्रेन क्रमांक 20171) ने प्रवास केला. ते भोपाळहून ग्वाल्हेरला जात होते. ट्रेनमधील त्याच्यासाठी सी-8 कोचमध्ये सीट क्रमांक-57 आरक्षित होती. प्रवाशाने जेवणाची ऑर्डर दिली. त्यांना देण्यात आलेल्या पराठ्यांमध्ये झुरळ आढळून आलं, त्यानंतर त्यांनी ट्विट करुन तक्रार दाखल केली. IRCTC प्रवाशाची माफी मागितली आहे. शिवाय या पुढे काळजी घेण्यात येईल अशी ग्वाही देखील दिली आहे.

भोपाळमध्ये पीआरओ सुभेदार सिंह यांनी सांगितले की, प्रवाशाच्या पराठ्यात झुरळ असल्याची माहिती समोर आली. ट्रेनमधील आयआरसीटीसीच्या अधिकाऱ्याने तात्काळ प्रवाशाशी संपर्क साधून कारवाई केली. प्रवाशांसाठी पर्यायी भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या