रोहित भट्ट (अल्मोडा), 25 मार्च : उत्तराखंड राज्य हे पर्यटनाच्या दृष्टीने अतिशय सुंदर मानले जाते. या भागातील दऱ्या आणि वातावरणामुळे मंत्रमुग्ध करणारे दृश्य पाहण्यासाठी देश-विदेशातून पर्यटक येत असतात. दरम्यान उत्तराखंडमध्ये अल्मोडा या ठिकाणी सुंदर असे कासारदेवीचे मंदीर आहे. या मंदिराला पर्यटकही मोठ्या संख्येने येत असल्याची चर्चा आहे. या मंदिरासाठी देशातूनच नव्हे तर परदेशातूनही मोठ्या संख्येने पर्यटक येत असतात यामुळे हे मंदिर जगप्रसिद्ध झाले आहे.
उत्तराखंडमधील कासार देवी हे असं क्षेत्र आहे आल्यावर एक वेगळीच शांतता अनुभवायला मिळते. याठिकाणी तुम्ही शांत वातावरणात ध्यान आणि योगासने करू शकता. या मंदिरात तुम्हाला परदेशी पर्यटक मोठ्या संख्येने पाहायला मिळतील.
रामनवमीपर्यंत करा हा विशेष पाठ, संकटांवर कराल सहज मात; पहा मंत्रोच्चाराची योग्य पद्धतपरदेशी पर्यटक या ठिकाणाशी इतके जोडले जातात की ते एकदा नव्हे तर अनेकदा येतात. या मंदिरात सर्वात जास्त अमेरिका, फ्रान्स, इटली, जर्मनी आणि इस्रायलचे नागरिक येत असतात. विदेशी पाहूणे 15 दिवस ते सुमारे 6 महिने राहत असतात.
‘न्यूज18 लोकल’ने काही परदेशी पर्यटकांशी चर्चा केली. यावेळी इस्रायलहून आलेल्या लिनाट्याने सांगितले की, कासार देवीचा परिसर अतिशय सुंदर आणि शांततामय परिसर आहे. येथून तुम्हाला निसर्गाचे उत्तम नजारे पाहायला मिळतात. विश्रांती व्यतिरिक्त, आपण येथून एक नवीन ऊर्जा घेतो.
तिने सांगितले की ती पूर्वी तामिळनाडूमध्ये राहात होती, परंतु तिच्या एका मैत्रिणीने तिला एकदा कासार देवीकडे जाण्यास सांगितले. यानंतर ती आणि त्याचे साथीदार या ठिकाणी आले आहेत. इथे आल्यानंतर त्यांना खूप बरे वाटत असल्याची माहिती त्यांनी दिली.
इस्रायलमधील रहिवासी असलेल्या इझाहेलने सांगितले की, त्याने कासार देवीचे नाव यापूर्वी कधीही ऐकले नव्हते, परंतु जेव्हा ते येथे आले तेव्हा त्यांना खूप चांगले वाटले. या परिसरात एक वेगळीच शांतता जाणवते. तर इथल्या सुंदर वातावरणाशिवाय हिमालयाच्या रांगाही पाहायला मिळतात. कासार देवीचे हवामानही चांगले आहे. या ठिकाणी एक वेगळ्या प्रकारची ऊर्जा आढळते, जी तो स्वतः अनुभवत आहे.
हॉटेल असोसिएशन ऑफ कासारदेवीचे अध्यक्ष मोहन रायल यांनी सांगितले की, कासारदेवीचा परिसर खूप प्राचीन आहे. मोठमोठे ऋषी, योगी, संगीतकार, लेखक याशिवाय अनेक नामवंत या ठिकाणी आले आहेत. परदेशी पर्यटक या ठिकाणी येऊन ध्यान करतात, असे त्यांनी सांगितले. याशिवाय योगासने आणि गावोगावी फिरण्याबरोबरच गावातील जीवनशैलीही पाहणारे अनेक पर्यटक आहेत. यासोबतच डोंगराच्या संस्कृतीचीही ओळख होते.