नवी दिल्ली 19 एप्रिल: कोरोनाचा प्रसार देशात झपाट्याने होत आहे. लोकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. लोकांनी काय काळजी घ्यावी याच्या मार्गदर्शक सूचनाही सरकारच्या वतीने देण्यात आल्या आहेत. लॉकडाऊनमुळे सगळे लोक घरात बंद आहेत. फक्त अत्यावश्यक सेवेसाठीच बाहेर पडायची परवानगी दिली जाते. असं वातावरण असताना उत्तर प्रदेशातलं मोठं शहर असलेल्या आग्र्यामध्ये एक भाजी विक्रेता कोरोना पॉझिटिव्ह निघाला आहे. त्यामुळे तब्बल 2 हजार लोकांना होम क्वारंटाइन करण्यात आलं आहे. हा भाजी विक्रेता पूर्वी ऑटो चालवत होता. मात्र लॉकडाऊनमुळे त्याची रिक्षा बंद झाली. त्यामुळे त्याने भाजी विक्रिचा व्यवसाय सुरू केला. काही दिवसांपूर्वी तो आजारी पडला त्यामुळे त्याची कोरोना चाचणी करण्यात आली तेव्हा तो पॉझिटिव्ह असल्याचं स्पष्ट झालं. या टेस्ट नंतर प्रशासन खडबडून जागं झालं आहे. तो ज्या भागात भाजी विक्री करत होता त्या भागातल्या त्याच्या संपर्कातल्या तब्बल 2 हजार लोकांना होम क्वारंटाइन करण्यात आलं आहे. या भाजी विक्रेत्याला लागण होण्याचं कारण प्रशासन शोधून काढत आहे. रिक्षातल्या प्रवाशामुळे त्याला लागण झाली असेल तर तो प्रवासी कोण याचा शोध आता पोलीस घेत आहेत. गृहमंत्रालयाने जारी केली नवी गाईडलाइन, संसर्ग नसल्यास मजुरांची कामावर रवानगी देशात कोरोनाबाधितांची संख्या वाढतच आहे. गेल्या24 तासांमध्ये COVID19चे 1334 रुग्ण आढळले. तर 24 जणांचा मृत्यू झालाय. त्यामुळे बाधितांची संख्या 15712 तर मृतांचा आकडा 507 वर गेला आहे. पाँडेचेरी इथल्या माहे आणि कर्नाटकमधल्या कोडगू जिल्ह्यात गेल्या 28 दिवसांमध्ये कोरोनाचा एकही रुग्ण आढळलेला नाही अशी माहिती केंद्रीय आरोग्य विभागाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी दिली आहे. गजानन महाराजांनी स्वप्नात सांगितलं कोरोनाचं औषध, गोव्यातल्या शिक्षकाचा दावा 23 राज्यांमधल्या 54 जिल्ह्यांमध्ये गेल्या 14 दिवसांपासून एकही रुग्ण आढळला नाही. आत्तापर्यंत 2,231 रुग्ण बरे झाले आहेत. आत्तापर्यंत 3,86,791 एवढ्या टेस्ट करण्यात आल्या आहेत अशी माहिती ICMRचे रमण गंगाखेडकर यांनी दिली.