जाहिरात
मराठी बातम्या / देश / गजानन महाराजांनी स्वप्नात सांगितलं कोरोनाचं औषध, गोव्यातल्या शिक्षकाचा दावा

गजानन महाराजांनी स्वप्नात सांगितलं कोरोनाचं औषध, गोव्यातल्या शिक्षकाचा दावा

गजानन महाराजांनी स्वप्नात सांगितलं कोरोनाचं औषध, गोव्यातल्या शिक्षकाचा दावा

ब्रिटनचे पंतप्रधान बोरीस जॉन्सन आणि गायिका कनिका कपूर यांच्याबद्दलही गजानन महाराजांनी भविष्य सांगितलं आहे असा दावाही या शिक्षकाने केला आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

पणजी 19 एप्रिल: कोरोनावर जगभर संशोधन सुरू आहे पण औषध सापडलेलं नाही. अनेक संस्था आणि शास्त्रज्ञांनी लस शोधल्याचा दावा केला असून त्याची परीक्षणं सुरू आहेत. त्याचे अंतिम निकाल येण्यास अजुन काही महिने जाणार आहेत. सगळं जग यावर औषध शोधत असतानाच गोव्यातल्या एका शिक्षकाने एक अजब दावा केला आहे. शेगावच्या संत गजानन महाराजांनी स्वप्नात दृष्टांत देऊन आपल्याला कोरोनाचं औषध सांगितलं असा दावा त्यांनी केला आहे. महेश देगवेकर असं या 55 वर्षीय शिक्षकाचं नाव असून आपण महाराजांचे निस्सीम भक्त असल्याचंही त्यांनी सांगितलं. या औषधाबद्दल त्यांनी केंद्रीय आयुष मंत्रालयाचे राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनाही पत्र लिहिलं होतं. त्यानंतर नाईक यांनी नुकतीच या शिक्षकाची त्यांच्या घरी जाऊन भेटही घेतली. या शिक्षकाने जो फॉर्म्युला सांगितला तो वैज्ञानिकांना तापसण्यासाठी देण्यात आला असल्याची माहिती नाईक यांनी दिली. ते म्हणाले, हा आयुर्वेदीक फॉर्म्युला आहे. कोरोनावर औषध सापडलेलं नाही त्यामुळे प्रतिकार शक्ती कशा पद्धतीने वाढवता येईल यावर जगभर विचार सुरू आहे. आयुर्वेदीक पद्धतीने त्यात सुधारणा करता येते. प्रतिकार शक्ती वाढवणारी काही औषधं आहेत मात्र त्यांना वैज्ञानिक मान्यता मिळालेली नाही अशी माहितीही त्यांनी दिली. हे वाचा -  देशातल्या कोरोनाबाधितांची संख्या 15 हजार 700 वर, तर मृत्यूने ओलांडला 500चा आकडा देगवेकर म्हणाले, लिंबू आणि अद्रक यांच्या रसाचं मिश्रण, त्यात बडीशेपचं पावडर, लसनाचे तुकडे आणि जंगली कारल्याचा रस या सर्वांचं मिश्रण करून हे औषध तयार केलं जातं. तीन दिवसांमध्ये याचा परिणाम दिसायला लागतो. 6 व्या दिवशी तो कोरोनापासून मुक्त होतो आणि 7व्या दिवशी तो घरी जाऊ शकतो असा दावाही त्यांनी केला. हे वाचा - लॉकडाऊनमुळे हरिद्वारमध्ये अडकले 70 यात्रेकरु, प्रशासनाकडे सुटकेची मागणी देगवेकर पुढे म्हणाले, ब्रिटनचे पंतप्रधान बोरीस जॉन्सन आणि गायिका कनिका कपूर यांच्याबद्दलही महाराजांनी सांगितलं आहे. हे दोघही कोरोनापासून मुक्त होतील असं गजानन महाराजांनी त्यांना सांगितलं असा दावाही त्यांनी केला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: goa
  • First Published :
जाहिरात
जाहिरात