JOIN US
मराठी बातम्या / देश / अहमदाबादला स्वागताला येतील 7 लाख लोक, भारत भेटीबद्दल भरभरून बोलले डोनाल्ड ट्रम्प

अहमदाबादला स्वागताला येतील 7 लाख लोक, भारत भेटीबद्दल भरभरून बोलले डोनाल्ड ट्रम्प

अहमदाबाद इथं बांधण्यात आलेल्या जगातल्या सगळ्यात मोठा क्रिकेट स्टेडियमध्ये डोनाल्ड ट्रम्प आणि नरेंद्र मोदी जाहीर सभेत भाषण करणार आहेत.

जाहिरात

Houston: President Donald Trump and Indian Prime Minister Narendra Modi walk around NRG Stadium waving to the crowd during the "Howdy Modi: Shared Dreams, Bright Futures" event, Sunday, Sept. 22, 2019, in Houston. AP/PTI Photo(AP9_23_2019_000011B)

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

वॉशिंग्टन 12 फेब्रुवारी : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे 24 आणि 25 फेब्रुवारीला भारत दौऱ्यावर येणार आहेत. त्यांच्यासोबत त्याच्या पत्नी मिलानिया याही राहणार आहेत. या दौऱ्याबद्दल ट्रम्प हे अतिशय उत्सुक असून व्हॉईट हाऊसमध्ये (WHITE HOUSE) ते भारत भेटीवर भरभरून बोलले आहेत. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निमंत्रणावरून ट्रम्प हे भारत भेटीवर येणार असून अध्यक्ष झाल्यानंतरही त्यांची ही पहिलीच भेट असणार आहे. या दौऱ्यात भारत आणि अमेरिकेदरम्यान महत्त्वाचा व्यापार करारही होण्याची शक्यता आहे. दिल्लीशीवाय ते मोदींचं गृहराज्य असलेल्या गुजरातलाही भेट देणार असून अहमदाबादला त्यांचा जाहीर कार्यक्रम होणार आहे. माझ्या स्वागतासाठी विमानतळ ते कार्यक्रम होणार असलेल्या स्टेडियमपर्यंत 5 ते 7 लाख लोक येतील असं त्यांनी सांगितलं. ट्रम्प म्हणाले, या भेटीबद्दल मी उत्सुक आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींशी याबद्दल फोनवरून बोलणं झालंय. ते माझे चांगले मित्र असून मोठे नेतेही आहेत. तुमच्या स्वागताला लाखो लोक राहतील असं मोदींनीच मला सांगितलं असंही ते म्हणाले. आम्ही मोदींच्या स्वागतला फक्त 50 हजारच लोक आणू शकलो होतो असंही त्यांनी विनोदाने पत्रकारांना सांगितलं. केजरीवाल यांनी विरोधकांना केलं क्लीन बोल्ड; ‘आप’ विजयाची ही होती पंचसूत्री 2019मध्ये झालेल्या अमेरिका दौऱ्यात ह्युस्टन इथं डोनाल्ड ट्रम्प आणि पंतप्रधान मोदी यांनी संयुक्त सभेला संबोधित केलं होतं. अशा प्रकारच्या कार्यक्रमात सहभागी होण्याची अमेरिकेच्या अध्यक्षांची ती पहिलीच वेळ होती.

पेट्रोल-डिझेलच्या दरात घसरण, आज 5 महिन्यातील सर्वात कमी दर

तशाच प्रकारचा कार्यक्रम अहमदाबादला होणार आहे. तिथे जगातलं सर्वात मोठं क्रिकेट स्टेडियम उभारलं जात असून या स्टेडियमवर मोदी आणि ट्रम्प यांची भाषणं होणार आहेत. या कार्यक्रमाबद्दल मला प्रचंड उत्सुकता आहे असंही ट्रम्प यांनी सांगितलं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या