समान नागरी कायद्याच्या दिशेने पावलं?
नवी दिल्ली, 27 जून : समान नागरी कायदा लागू करण्याबाबतच्या हालचालींना दिल्लीमध्ये वेग आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समान नागरी कायदा आणि तीन तलाकबाबत केलेल्या वक्तव्यानंतर आता केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेण्यासाठी कायदामंत्री अर्जुनराम मेघवाल आले होते. मंगळवारी संध्याकाळी कायदामंत्री अर्जुनराम मेघवाल यांनी अमित शाह यांची भेट घेतली. काय म्हणाले मोदी? भोपाळमध्ये आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी भाषणात पंतप्रधान मोदींनी समान नागरी कायद्याचा उल्लेख केला. सर्वोच्च न्यायालय कायदा करा असं सांगतंय असं मोदींनी म्हटलं. मात्र याचा विषय काढला की विरोधक आमच्यावर टीका करतात, असं मोदी म्हणाले. पंतप्रधान मोदींकडून सुप्रिया सुळेंचा उल्लेख, शरद पवारांचा पलटवार, म्हणाले… ‘समान नागरी कायद्याच्या नावाखाली लोकांना भडकवण्याचे काम सुरू असल्याचं आपण पाहत आहोत. घरातल्या कुटुंबातील एका सदस्यासाठी एक आणि दुसऱ्यासाठी दुसरा कायदा असेल, तर ते कुटुंब चालवता येईल का? मग अशा दुहेरी व्यवस्थेने देश कसा चालवणार? भारतीय राज्यघटना देखील नागरिकांच्या समान हक्कांबद्दल बोलते हे आपण लक्षात ठेवले पाहिजे, असं वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. विधी आयोगाने या महिन्यातच समान नागरी कायद्याबाबत सामान्य लोक आणि मान्यताप्राप्त धार्मिक संघटनांसह विविध भागधारकांची मतं मागवली आहेत. 14 जून रोजी जारी केलेल्या नोटीसमध्ये, कायदा आयोगाने एका महिन्याच्या आत टिप्पण्या मागितल्या आहेत. या सूचना आणि टिप्पण्या ईमेलद्वारे किंवा लिंकद्वारे ऑनलाइन पाठवता येणार आहेत. समान नागरी कायदा 2024 च्या निवडणुकांसाठी मोदी सरकारचा प्रमुख अजेंडा ठरू शकतो. जम्मू-काश्मीरमध्ये कलम 370 हटवल्यानंतर तसंच अयोध्येतल्या राम मंदिरानंतर समान नागरी कायदा भाजपच्या निवडणूक मोहिमेचा भाग ठरू शकतो. पहिल्यांदाच पंतप्रधान मोदी यांनी समान नागरी कायद्याबाबत जाहीर वक्तव्य केलंय. त्यामुळे 2024च्या निवडणुकांआधी समान नागरी कायदा येणार का? समान नागरी कायदा निवडणुकीत मुद्दा ठरणार का? या कायद्यामुळे विरोधकांची कोंडी होणार का? अशा चर्चा सुरु झाल्यात. पंकजा मुंडेंनंतर बीआरएसच्या टार्गेटवर महाराष्ट्रातला आणखी एक बडा नेता, थेट मुख्यमंत्रिपदाची ऑफर