JOIN US
मराठी बातम्या / देश / कंपनीच्या बिझनेस ट्रिपवर गेला तुर्कीला, भूकंपानंतर बेपत्ता भारतीयाचा सापडला मृतदेह

कंपनीच्या बिझनेस ट्रिपवर गेला तुर्कीला, भूकंपानंतर बेपत्ता भारतीयाचा सापडला मृतदेह

तुर्कीत विजय ज्या हॉटेलमध्ये थांबला होता ते सोमवारी पहाटे भूकंपात जमिनदोस्त झालं होतं. तेव्हापासून त्याच्याशी कोणताही संपर्क होत नव्हता.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

अंकारा, 11 फेब्रुवारी : तुर्की आणि सीरियातील भूकंपबळींची संख्या २० हजारांच्या वर पोहोचली आहे. आता या भूकंपात भारतीय नागरिकाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आलीय. भारतीय दुतावासाने शनिवारी याबाबत माहिती देताना सांगितलं की, विजय कुमार गौंड यांचा मृतदेह तुर्कीमध्ये एका फोर स्टार हॉटेलच्या उद्ध्वस्त इमारतीत आढळला होता. त्याच्या कुटुंबियांनी एका टॅटूच्या आधारे त्याची ओळख पटवली. उत्तराखंडच्या कोटद्वार इथं राहणारा विजय हा बंगळुरुतील ऑक्सी प्लांट्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत काम करत होता. तुर्कीत जेव्हा भूकंप आला तेव्हा तो बिझनेस ट्रिपवर होता. तुर्कीतील भारतीय दुतावासाने म्हटलं की, आम्हाला ही माहिती देताना दु:ख होतंय की, भूकंपानंतर बेपत्ता झालेला भारतीय नागरिक विजय कुमारचा मृतदेह आढळून आला आहे. मलत्यामधील एका हॉटेलच्या उद्ध्वस्त ढिगाऱ्यात आढळलेल्या मृतदेहाची ओळख पटवण्यात आली आहे. तो हॉटेलमध्ये एका बिझनेस ट्रिपवर आला होता. हेही वाचा :  आशेचा किरण! तुर्कस्तानमध्ये 100 तासांनंतरही ढिगाऱ्यातून जिवंत लोक बाहेर; इमोशनल करणारी घटना समोर विजय कुमार गौडच्या कुटुंबियांनी दिलेल्या माहितीनुसार, तुर्कीत विजय ज्या हॉटेलमध्ये थांबला होता ते सोमवारी पहाटे भूकंपात जमिनदोस्त झालं होतं. तेव्हापासून त्याच्याशी कोणताही संपर्क होत नव्हता. विजय बेपत्ता झाल्यानं त्याच्या कुटुंबियांनी जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून परराष्ट्र मंत्रालय आणि तुर्कीतील भारतीय दुतावासाशी संपर्क साधला होता. विजयच्या मोठ्या भावाने सांगितलं की, विजय बंगळुरुतील ऑक्सी प्लांट इंडिया प्रायव्हेट लिमिटेडमध्ये नोकरी करत होता. २२ फेब्रुवारीला कंपनीच्या कामानिमित्त तुर्कीला गेला होता. भूकंपाची माहिती मिळताच आम्ही त्याला कॉल केला पण त्याचा फोन कुणीच उचलला नाही. विजयसोबत पाच फेब्रुवारीला शेवटचं बोलणं झालं होतं. विजयच्या पश्चात त्याची पत्नी आणि ६ वर्षांचा मुलगा आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या