जाहिरात
मराठी बातम्या / विदेश / आशेचा किरण! तुर्कस्तानमध्ये 100 तासांनंतरही ढिगाऱ्यातून जिवंत लोक बाहेर; इमोशनल करणारी घटना समोर

आशेचा किरण! तुर्कस्तानमध्ये 100 तासांनंतरही ढिगाऱ्यातून जिवंत लोक बाहेर; इमोशनल करणारी घटना समोर

आशेचा किरण!

आशेचा किरण!

भीषण भूकंपामुळे झालेल्या विध्वंसानंतर आता तुर्कस्तानमध्ये ढिगार्‍यांमध्ये जिवंत लोकांचा शोध सुरू असून 100 तासांहून अधिक काळ लोटल्यानंतरही लोक जिवंत सापडत आहेत.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

इस्केंडरुन (तुर्की), 10 फेब्रुवारी : तुर्कस्तानला झालेल्या जोरदार भूकंपाच्या 100 तासांनंतर, बचाव आणि मदत कर्मचार्‍यांनी ढिगाऱ्यातून काही लोकांना जिवंत बाहेर काढल्याने सुटकेचा नि:श्वास सोडला. 7.8 आणि 7.5 रिश्टर स्केलच्या दोन मोठ्या भूकंपांमुळे तुर्की आणि सीरियामध्ये प्रचंड विध्वंस झाला. यामध्ये 20 हजारांहून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला. तुर्कस्तानच्या इस्केंडरुनमधील बचावकर्त्यांनी 101 तास ढिगाऱ्याखाली दबलेल्या सहा जणांना शुक्रवारी सकाळी जिवंत बाहेर काढले. शोध आणि बचाव कर्मचारी मुरत बेगुल यांनी सांगितले की, कोसळलेल्या इमारतीच्या आत उरलेल्या छोट्या जागेत एकत्र राहिल्याने सहा जणांना वाचण्यास मदत झाली, सहाही जण नातेवाईक आहेत. या भूकंपात झालेल्या मृतांची संख्या जपानमधील फुकुशिमा येथे भूकंप आणि त्सुनामीमुळे झालेल्या जीवितहानीपेक्षा जास्त आहे. ढिगाऱ्याखालून मृतदेह बाहेर काढण्याचे काम अद्याप सुरू आहे, त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. काही दिवसांनंतर, भूकंपाचा केंद्रबिंदू असलेल्या गझियानटेप येथील इमारतीतून बचाव कर्मचार्‍यांनी 17 वर्षीय अदनान मुहम्मद कोर्कुटला जिवंत बाहेर काढले. 94 तास ढिगार्‍याखाली दबून तो स्वतःची लघवी पिऊन जिवंत राहिला. कोरकुट म्हणाले, ‘देवाचे आभारी आहे की तुम्ही (बचावकर्ते) आलात.’ 105 तासांनंतर योगीझ कोमसू नावाच्या चार वर्षांच्या मुलाला काढलं जिवंत बाहेर दरम्यान, भूकंपानंतर ढिगाऱ्याखाली दबलेल्या योगीझ कोमसू नावाच्या चार वर्षांच्या मुलाला सुमारे 105 तासांनंतर आदियमान येथील बचाव कर्मचाऱ्यांनी जिवंत बाहेर काढले. बचाव कार्याचे थेट प्रक्षेपण करणारे हेबर तुर्क यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलाला बाहेर काढल्यानंतर त्याच्या आईला ढिगाऱ्यातून बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत. मुलाला बाहेर काढल्यानंतर बचाव कर्मचार्‍यांनी गर्दीला सांगितले की, मुलाला धक्का बसल्यामुळे सेलिब्रेशन आवाज करू नका. हॅबर्टर्क टेलिव्हिजन चॅनेलने वृत्त दिले आहे की इस्केंडरुन शहरातील बहुमजली इमारतीच्या ढिगाऱ्यात अडकलेल्या नऊ लोकांची ओळख पटली आहे, त्यापैकी एका महिलेसह सहा जणांना बाहेर काढण्यात आले आहे. भूमध्य समुद्रापासून ही इमारत अवघ्या 200 मीटर अंतरावर होती. भूकंपानंतर उंच लाटांच्या तडाख्यातून ती थोडक्यात बचावली असल्याचे त्यांनी सांगितले. वाचा - सात वर्षांच्या मुलीनं 17 तास केलं भावाचं संरक्षण, हृदयद्रावक Video Viral एखादी व्यक्ती ढिगाऱ्याखाली एक आठवडा किंवा त्याहून अधिक काळ जगू शकते? ढिगाऱ्यातून जिवंत बाहेर काढण्यात आल्याच्या घटनाही समोर आल्या आहेत. जर्मन बचाव पथकाने सांगितले की, किरीखानमधील एका घराच्या ढिगाऱ्यातून एका महिलेला 50 तासांनंतर जिवंत बाहेर काढण्यात यश आले आहे. भूकंपाचा सर्वाधिक फटका बसलेल्या कहरामनमारसमध्ये दोन किशोरवयीन बहिणींना वाचवण्यात आले. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की एखादी व्यक्ती ढिगाऱ्याखाली एक आठवडा किंवा त्याहून अधिक काळ जगू शकते, परंतु कडाक्याच्या थंडीमुळे त्याची शक्यता धूसर होत आहे. विशेष म्हणजे या परिसरात कडाक्याची थंडी असून मृतदेह ठेवण्यासाठी आणि त्यांची ओळख पटविण्यासाठी तात्पुरती शवगृहे करण्यात आली आहेत. अनेक भागात लोक अजूनही तंबू आणि अन्नासाठी झगडत आहेत. दरम्यान, भूकंपानंतर प्रथमच सीरियाचे राष्ट्राध्यक्ष बशर अल-असद शुक्रवारी सार्वजनिकरित्या दिसले. त्यांनी पत्नी अस्मासोबत अलेप्पो विद्यापीठ रुग्णालयाला भेट दिली. भूकंपग्रस्त भागातील बचाव कर्मचार्‍यांचीही त्यांनी भेट घेतली.

News18लोकमत
News18लोकमत

भूकंपामुळे 18,300 लोकांचा मृत्यू तुर्कस्तानच्या आपत्ती व्यवस्थापन संस्थेने भूकंपामुळे आतापर्यंत 18,300 लोकांचा मृत्यू आणि सुमारे 75,000 लोक जखमी झाल्याची पुष्टी केली आहे. सरकारने आतापर्यंत बेघर लोकांची संख्या सांगितलेली नाही. त्याच वेळी, सीरियातील भूकंपात 3,300 लोकांचा मृत्यू झाल्याची पुष्टी झाली आहे, ज्यामध्ये आतापर्यंत एकूण 21,600 लोकांचा या भूकंपात मृत्यू झाला आहे. त्याचवेळी, 2011 मध्ये, जपानमधील फुकिशिमा येथे भूकंप आणि त्सुनामीमध्ये प्राण गमावलेल्या लोकांची संख्या 18,400 होती. तुर्कीचे पर्यावरण आणि शहरी नियोजन मंत्री मुरत कुरुम यांच्या मते, देशातील सुमारे 12,000 इमारती एकतर कोसळल्या आहेत किंवा त्यांचे गंभीर नुकसान झाले आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात