प्रातिनिधिक फोटो
सुकमा, 23 एप्रिल : कोरोना व्हायरसचा (Coronavirus) संसर्ग रोखण्यासाठी सरकारने 3 मेपर्यंत लॉकडाऊन (Lockdown) लागू केला आहे. मात्र यामुळे विविध राज्यांमध्ये अडकलेल्या मजुरांना आपल्या घरचे वेध लागले आहे. त्यामुळे घर गाठण्यासाठी आतापर्यंत अनेक मजुर विविध मार्गांचा वापर करीत आहेत. छत्तीसगडमधील सुकमा येथे राहणारे मजुर तब्बल 250 किमी पायी प्रवास करीत आपल्या घराजवळपर्यंत पोहोचले. त्यांचं घर नदीच्या पलीकडे होतं. त्यातच नदीतील होडी बंद असल्याने त्यांच्यासमोर मोठं संकट उभं राहिलं. यातही 6 मजुरांनी नदीत उडी मारली. त्यानंतर 5 मजुर सुखरुप नदी पार करुन पलीकडे पोहोचले. मात्र एक मजुर पाण्यामध्ये अडकला. त्यानंतर स्थानिकांच्या मदतीने त्याला बाहेर काढण्यात आलं. आंध्रप्रदेशातील जंगारेड्डीगुडम येथील फाम ऑईल कारखान्यात काम करणारे ओदिशाचे मलकानगिरीमध्ये राहणारे मजुर 250 किमी पायी चालत कोटापर्यंत पोहोचले. शबरी नदीच्या घाटावर पोहोचून 6 मजुर पोहून नदीच्या पलीकडे गेले. यामध्ये एक मजुर नदीच्या प्रवाहाने वाहू लागला. त्यात तो नदीच्या मध्ये असलेल्या एका झाडाला पकडून तब्बल 2 तास बाहेर निघण्याचा प्रयत्न करीत होता. शेवटी नदीवर आलेल्या एका तरुणीने याबाबत स्थानिकांना माहिती दिली. स्थानिकांनी बोटीच्या साहाय्याने नदीच्या मध्ये अडकलेल्या तरुणाला बाहेर काढले. प्रत्येक राज्य सरकारकडून तेथील मजुरांच्या राहण्याची व खाण्याची सोय केली जात आहे. त्यामुळे मजुरांनी कोणत्याही बेकायदेशीर मार्गाचा वापर करून घरी जाण्याचा प्रयत्न करू नये असं आवाहन करण्यात आलं आहे. असं असलं तरी मोठ्या संख्येने मजुर रस्ता वा रेल्वे ट्रॅकवरुन घरी जाण्याचा प्रयत्न करीत आहे. संबंधित - तबलिगी जमातच्या सदस्यांनी कोरोनाला हरवलं, आता असा वाचवणार दुसऱ्या रुग्णांचा जीव मुस्लीम धर्मियांचे स्तुत्य पाऊल, रमजानमध्ये कुराणचे पठण होणार फेसबुक लाईव्ह