JOIN US
मराठी बातम्या / देश / बोरासारखे दिसणारे हे जंगली फळ अनेक आजारांवर लाभदायी असल्याचा दावा, किंमतही फार कमी

बोरासारखे दिसणारे हे जंगली फळ अनेक आजारांवर लाभदायी असल्याचा दावा, किंमतही फार कमी

वैध जगन्नाथ मिश्रा यांनी सांगितले की, टींट लोणचे खाल्ल्याने रक्त शुद्ध होते.

जाहिरात

टींट फळ

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

पीयूष पाठक, प्रतिनिधी अलवर, 20 जुलै : लोणचं हे अनेकांच्या आवडीचं आहे. त्यामुळे भारतीय जेवणपद्धतीत लोणचं हे असतंच. लोणचं हे खायला तर चविष्ट असतेच पण आरोग्यासाठीही ते फायदेशी आहे, असे मानले जाते. दरम्यान, सध्या बाजारात लोणचं स्वरुपात वापरण्यात येणारे एक जंगली फळ आले आहे. तसेच तर या फळाला कैर असे म्हटले जाते. पण स्थानिक भाषेत त्याला टींट असे म्हणतात. सध्या राजस्थान राज्यातील अलवरमध्ये लोणच्यासाठी टींटची आवक होत आहे. खरंतर पहिल्या पावसासोबतच टींटची आवक होते. मात्र, यावेळी टीट मोसमाच्या शेवटच्या टप्प्यात बाजारात पाहायला मिळत आहे. हे फळ पहाडी क्षेत्रांमध्ये फक्त पावसाळ्यात येते. अलवरच्या मंडईमध्ये ते 100 रुपये किलो या दराने विकले जात आहे.

आरोग्यासाठी फायदेशीर - वैध जगन्नाथ मिश्रा यांनी सांगितले की, टींट लोणचे खाल्ल्याने रक्त शुद्ध होते. तसेच पोटासाठी हे खूप फायदेशीर असते. विशिष्ट प्रमाणात ते वेळो-वेळी खाल्याने पोटासंबंधी समस्यांपासून आराम मिळतो. जर टीटला वाळवून त्याची पावडर बनवून ते सेवन केले तर सांधेदुखी, खोकला, सूज, मधुमेह, अपचन, बद्धकोष्ठता इत्यादी आजारांपासून आराम मिळतो. कुठे होते उत्पादन - अलवर शहराच्या बस स्टँडच्या समोर लोक रस्त्यावरच टींट विकत आहेत. टींट विक्रेत्या राम सिंह यांनी सांगितले की, हे फळ फक्त पावसाळ्यातच येते. यापासून लोक लोणचं बनवतात. तसेच हे फळ फक्त पहाडी, पर्वत क्षेत्रात मिळतं. आता जो टींट विकला जात आहे तो अलवर जिल्ह्यातील सेहरावास परिसरातून आला आहे. सध्या त्याचे उत्पादन अजून कमी आहे. यामुळे तिथले स्थानिक लोकच याला तोडून अलवरमध्ये विकत आहेत. या टींटची विक्री 100 रुपये किलोने होत आहे, असेही रामसिंह यांनी सांगितले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या