गोऱखपूर, 5 मे : सध्या देशभरात कोरोनाच्या (Coronavirus) संकटामुळे लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. गेल्या महिनाभरापासून अधिक काळासाठी बंद असलेली दारुची दुकाने खुली करण्याची परवानगी काही भागात देण्यात आली आहे. त्यातच एक धक्कादायक वृत्त समोर आलं आहे. उत्तर प्रदेशातील गोरखपूरमधील एक महिलेने आपल्या तीन मुलींसह ट्रेनखाली आत्महत्या केली. मिळालेल्या माहितीनुसार, महिलेचे पतीसोबत दारुवरुन भांडण झाले होते. या घटनेनंतर पती फरार झाला आहे. ही घटना पिपराईच ठाणे क्षेत्रातील उनौला रेल्वे स्टेशनजवळील आहे. मृतदेहांना शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले आहे. लॉकडाऊनमध्ये दारुची दुकानं खुली करण्याचा मोठा फटका पाहायला मिळत आहे. पतीचे दारु पिण्यावरुन पत्नीसोबत भांडण झालं. त्यातच पत्नीने आपल्या तीन मुलींसह आत्महत्या केली. सांगितले जात आहे की, दारुवरुन पती-पत्नीमध्ये भांडण होत होती. मात्र लॉकडाऊनमध्ये दारुची दुकानं बंद असल्याने गेल्या महिनाभरात दोघांमध्ये वाद होत नव्हते. मात्र काल 40 दिवसांनंतर दारुची दुकानं खुली झाल्याने पती पुन्हा दारु पिऊन घरी आला. यावरुन दोघांमध्ये वाद झाला. यातच महिलेने तीन मुलींसह उनौला स्टेशनजवळ येऊन ट्रेनसमोर उडी मारली. मिळालेल्या माहितीनुसार अजय निषाद यांनी 10 वर्षांपूर्वी गावातील पूजा निषाद हिच्याशी प्रेमविवाह केला होता. लग्नानंतर त्यांना सारिका (9 वर्ष), सिमरन (7 वर्ष), सौम्या (5 वर्ष) या तीन मुली झाल्या. मुलींवरुनही पती-पत्नीमध्ये वाद होत होता. एसएसपी सुनील गुप्ता यांनी सांगितल्यानुसार पती-पत्नीमध्ये मुलींवरुनही वाद होत असे. सध्या अजय निषाद याला आत्महत्या करण्यास उद्युक्त करण्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित- अहवालातून आलं अमेरिकेतील धक्कादायक वास्तव, एका दिवसात 3000 कोरोना बळींची शक्यता ‘ते योद्धे होते, मी रडणार नाही’; शहीद आशुतोष शर्मा यांच्या पत्नीने दिला मुखाग्नी