Home /News /videsh /

मृत्यूचा तांडव! अहवालातून आलं अमेरिकेतील धक्कादायक वास्तव, एका दिवसात 3000 कोरोना बळींची शक्यता

मृत्यूचा तांडव! अहवालातून आलं अमेरिकेतील धक्कादायक वास्तव, एका दिवसात 3000 कोरोना बळींची शक्यता

अमेरिकेच्या जॉन हॉपकिन्स यूनिवर्सिटीच्या विज्ञान आणि इंजीनियरिंग केंद्राकडून (सीएसएसई) जारी केलेल्या संख्येनुसार अमेरिकेत कोरोनामुळे आतापर्यंत  5521303 लोकांना संसर्ग झाला असून 175350 जणांचा मृत्यू झाला आहे. ब्राजीलमध्ये आतापर्यंत 3532330 लाख लोगांना याची लागण झाली असून 113318 लोकांचा मृत्यू झाला आहे.

सोमवारपर्यंत अमेरिकेत 12 लाखांहून अधिक जणांना कोरोनाची लागण झाली असून मृतांची संख्या 69000 हून अधिक आहे.

    वॉशिंग्टन, 5 मे : अमेरिकेत 1 जूनपर्यंत कोरोना व्हायरसमुळे (Coronavirus) मृतांची संख्या प्रत्येक दिवशी 3000 पर्यंत पोहोचण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ही बाब अत्यंत गंभीर असून यापुढे दिलेल्या अहवालानुसार बाधितांचा आकडा एका दिवसाला 2 लाखापर्यंत पोहोचण्याची भीती व्यक्त केली जात आहे. अंतर्गत मसूदा अहवालातून ही माहिती समोर आली आहे. कोरोनाच्या संकटात अमेरिकेतील अनेक राज्यांनी आपली अर्थव्यवस्था सुरू करण्याची घोषणा केली आहे. सोमवारपर्यंत 12 लाखांहून अधिक अमेरिका नागरिकांना कोरोनाची लागण झाल्याची बाब समोर आली आहे. तर मृतांची संख्या 69000 हून अधिक झाली आहे. याशिवाय 3 कोटींहून अधिक अमेरिकी नागरिकांनी बेरोजगारी भत्त्यांची मागणी केली आहे. सोमवारी मसूदा अहवालानुसार 1 जूनपर्यंत कोरोनामुळे संसर्ग होणाऱ्यांची संख्या 2 लाखांपर्यंत पोहोचू शकते. तर मृतांचा आकडा 3000 पर्यंत जाऊ शकतो, असेही नमूद करण्यात आले आहे. हा आकडा चिंता वाढवणारा आहे. जगभरातील ज्या देशांना कोरोनाचा सर्वाधिक फटका बसला त्यामध्ये अमेरिकेचा समावेश आहे. कोरोनाबरोबरच अर्थव्यवस्था ढासळत असल्याने सर्वच देशांची चिंता वाढली आहे. न्यूयॉर्क टाइम्सने यासंदर्भातील वृत्त प्रसिद्ध केले आहे. द वॉशिंग्टन पोस्टने दिल्यानुसार हा अहवाल जॉन हॉपकिंस ब्लूमबर्ग स्कूल ऑफ पब्लिक हेल्थ विज्ञानचे एसोसिएट प्रोफेसर जस्टिन लेसलर यांनी तयार केला आहे. व्हाइट हाऊसने मात्र हा दस्तावेज आमच्याकडून प्रदर्शित केला नसल्याचे सांगितले. त्याशिवाय हा अहवाल कोणत्याही अंतर्गत एजन्सीने तपासल्याचाही व्हाइट हाऊसने नकार दिला आहे. संबंधित -'ते योद्धे होते, मी रडणार नाही'; शहीद आशुतोष शर्मा यांच्या पत्नीने दिला मुखाग्नी कुलूप तोडून टाका, रोहित पवारांनी आक्रमक पवित्रा पाहून दुकानदार हादरला
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    पुढील बातम्या