जयपूर, 5 मे : जम्मू-काश्मीरमधील (Jammu Kashmir) हंदवाडामधील दहशतवाद्याशी दोन हात करीत असताना कर्नल आशुतोष शर्मा शहीद झाले. या चकमकीत त्यांच्यासह 5 जवान शहीद झाले. शहीद आशुतोष शर्मा यांच्यावर मंगळवारी सैन्याच्या सन्मानासह जयपूरमध्ये अंतिम संस्कार करण्यात आला. दोन दिवसांपासून आपले अश्रू रोखून धरलेली कर्नल यांची पत्नी पल्लवीला आज अश्रू आवरणं शक्य होत नव्हतं. माझे पती दहशतवाद्यांशी दोन हात करताना शहीद झाले. ते योद्धा होते. त्यामुळे मी रडणार नाही, अशी भावनिक प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली. मुख्यमंत्री अशोक गहलोक यांनी शहीद आशुतोष शर्मा यांना पुष्पचक्र अर्पण करीत श्रद्धांजली दिली. शहीद यांची पत्नी पल्लवी आणि भाऊ पीयूष यांनी दिला मुखाग्नी राजधानी जयपूरमध्ये खातीपुरा रोड येथील चुंगी मोक्षधाम येथे कर्नल आशुतोष शर्मा यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात आला. यापूर्वी सेनाचे 61 कैवलरी पोलो ग्राऊंडवर शेवटची सलामी देत श्रद्धांजली देण्यात आली
शहीद आशुतोष शर्मा यांची पत्नी यावेळी म्हणाली, ते वीर योद्धा होते आणि वीर योद्ध्याप्रमाणे लढत असताना शहीद झाले. मला रडायचं नाहीये, माझं संपूर्ण कुटुंब त्यांच्याकडून प्रेरित आहोत. यावेळी शहीद आशुतोष शर्मा यांचे छोटे भाऊ म्हणाले, माझा मुलगा माझ्या भावाकडून इतका प्रेरित झाला आहे की तो आता आर्मीमध्ये भरती होण्याची तयारी करीत आहे. कुटुंबीयांला याचा आनंद आहे की शहीद आशुतोष यांच्यानंतर त्यांच्या घरातील आणखी एक सदस्य सैन्यात भरती होणार आहे. शहीद आशुतोष शर्मा यांच्याकडून अनेकांनी प्रेरणा घेतला आहे. संबंधित- शर्थीचे प्रयत्न, कोरोनाची लस तयार करण्यासाठी तब्बल 100 संशोधन गटांकडून काम सुरू