मुंबई, 09 फेब्रुवारी**:** छोट्या पडद्यावरची गाजलेली मालिका ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’वर पुन्हा एकदा शोककळा पसरली आहे. मालिकेच्या फॅन्ससाठीही दु:खद बातमी आहे. कारण मालिकेचे सदस्य आणि फॅन्स डॉ. हाथीचं पात्र साकारणारे अभिनेते कवी कुमार आजाद, यांच्या निधनाने सावरत नाही तोपर्यंत आणखी एका सदस्याचं निधन झाल्याची बातमी समोर आली आहे. ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ मालिकेच्या टीमसोबत सर्वाधिक वेळ असलेले मेकअप आर्टिस्ट आनंद परमार निधन झालं आहे. ही बातमी समजताच मालिकेचं शूटिंग रद्द करण्यात आलं. गेल्या 12 वर्षांपासून ते या मालिकेसाठी काम करत होते. आजारी असतानाही त्यांनी आपलं काम थांबवल नव्हतं. आनंद दादा म्हणून त्यांची सर्वांमध्ये ओळख होती. रविवारी (9 फेब्रुवारी) त्यांच्यावर कांदिवली पश्चिम येथे हिंदू पद्धतीने अंत्यसंस्कार करण्यात आले. निधनाची बातमी समजताच मालिकेतील कलाकारांसह संपूर्ण टीमला मोठा धक्का बसला. यावेळी एक दिवस चित्रीकरण न करण्याचा निर्णय घेण्यात आलं.
(हेही वाचा : सलमान मध्यरात्री जायचा शिल्पाच्या घरी, अभिनेत्रीनं सांगितलं धक्कादायक कारण ) मालिकेतील अभिनेत्री अंबिका रंजनकर यांनी सोशल मीडियावर पोस्टद्वारे त्यांना श्रद्धांजली अर्पित केली. यावेळी ‘दादा तुमच्या आत्म्याला शांती मिळो. वरिष्ठ मेकअपमॅन, नेहमीच मेहनतीवर विश्वास ठेवणारे, सतत हसमुक आणि प्रेमळ…!’, अशी भावना त्यांनी आपल्या पोस्टमधून व्यक्त केली. अंबिका मालिकेत मि. हाथीची भूमिका साकरत आहेत. दरम्यान, 2018 मध्ये ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ मालिकेतील डॉ. हंसराज हाथी ही व्यक्तिरेखा साकारणारे अभिनेते कवी कुमार आजाद यांचं निधन झालं होतं. हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचं निधन झालं होतं. त्यांनीही आपल्या अभिनयाने प्रेक्षकांचं भरपूर मनोरंजन केलं होतं. (हेही वाचा : कपिल शर्मानं स्वतःच्याच शोमध्ये हात जोडून मागितली साराची माफी, पाहा VIDEO ) (हेही वाचा : सारा अली खान ते शाहिद कपूर, ‘या’ स्टारकिड भावंडांच्या वयात आहे मोठं अंतर )