जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / सलमान मध्यरात्री जायचा शिल्पाच्या घरी, अभिनेत्रीनं सांगितलं धक्कादायक कारण

सलमान मध्यरात्री जायचा शिल्पाच्या घरी, अभिनेत्रीनं सांगितलं धक्कादायक कारण

सलमान मध्यरात्री जायचा शिल्पाच्या घरी, अभिनेत्रीनं सांगितलं धक्कादायक कारण

शिल्पा शेट्टी आणि सलमान एकमेकांचे खूप चांगले मित्र आहेत मात्र काही काळापूर्वी एका मुलाखातीत तिनं सलमानबद्दल धक्कादायक खुलासा केला होता.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 09 फेब्रुवारी : शिल्पा शेट्टी आणि सलमान खान बॉलिवूडमधील चांगले मित्र मानले जातात. या दोघांनीही ‘औजार’, ‘गर्व: प्राइड अँड ऑनर’, ‘फिर मिलेंगे’, आणि ‘शादी कर के फंस गया यार’ या सिनेमात एकत्र काम केलं आहे. सध्या सलमान खान त्याचा आगामी सिनेमा राधेमुळे चर्चेत आहे तर दुसरीकडे शिल्पा सुद्धा निकम्मा या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पुनरागमन करत आहे. यानिमित्त तिनं सलमान खानचा शो बिग बॉसमध्ये हजेरी लावली होती. हे दोघंही खूप चांगले मित्र आहेत. बिग बॉसच्या घरात शिल्पा आणि सलमाननं खूपच धम्माल केली. पण याआधी शिल्पानं सलमान बद्दल एक धक्कादायक खुलासा केला होता. शिल्पा कोणत्याही मुलाखतीत आपल्या खासगी आयुष्याबद्दल बोलणं टाळते. मात्र मागील वर्षी दिलेल्या एका मुलाखतीत शिल्पानं आपल्या आयुष्यातील अनेक गोष्टींचा खुलासा केला. यावेळी तिनं एकेकाळी सलमान सोबत अफेअर असल्याच्या अफवांबाबतही आपली प्रतिक्रिया दिली होती. वयाच्या 40 व्या वर्षी अभिनेत्रीनं उरकला साखरपुडा, पाहा PHOTO

जाहिरात

या मुलाखतीत शिल्पा म्हणाली, ‘मी आणि सलमान फक्त चांगले मित्र आहोत. त्याहून जास्त आमच्यामध्ये काहीही नाही. सलमानचे माझ्या कुटुंबीयांशीही चांगले संबंध आहेत. तो अर्ध्या रात्री माझ्या घरी येऊन माझ्या वडीलांसोबत ड्रिंक करायचा आणि ते दोघं खूप गप्पा मारत असत. जेव्हा माझ्या वडीलांचा मृत्यू झाला त्यावेळीही तो माझ्या घरी आला होता. त्यावेळी तो खूप दुःखी होता.’ सारा अली खान ते शाहिद कपूर, ‘या’ स्टारकिड भावंडांच्या वयात आहे मोठं अंतर शिल्पा म्हणाली, ‘सलमान आणि मी खूप चांगले मित्र होतो आणि आताही आहोत. पण आम्ही कधीच एकमेकांना डेट केलं नाही. सलमान खूप चांगली व्यक्ती आहे. शिल्पा शेट्टी अक्षय कुमारसोबत रिलेशनशिपमध्ये होती, पण नंतर ते दोघे वेगळे झाले. त्यानंतर एका मुलाखतीत, ‘अक्षयनं मला स्वार्थासाठी वापरून सोडून दिलं.’ असंही सांगितलं होतं.

शिल्पानं 2009 मध्ये बिझनेसमन राज कुंद्राशी लग्न केलं. पण जेव्हा ती पहिल्यांदा राजला भेटली होती त्यावेळी तिला त अजिबात आवडला नव्हता. शिल्पा आणि राज पहिल्यांदा राजच्या घरी भेटले होते. त्यावेळी राज लंडन येथे स्थायिक होता आणि शिल्पाला लंडनला स्थायिक व्हायचं नव्हतं, असा खुलासा शिल्पानं या मुलाखतीत केला होता. प्रियांका चोप्रा इव्हेंटसाठी वापरते एवढा महागडा ड्रेस, किंमत ऐकून व्हाल थक्क निकम्मा सिनेमातून शिल्पा शेट्टी बॉलिवूडमध्ये पुनरागमन करत आहे. शब्बीर खानचं दिग्दर्शन असणारा हा सिनेमा 5 जूनला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. शिल्पाच्या चाहत्यांना तिच्या पुनरागमनाची खूप उत्सुकता आहे. शिल्पानं तिच्या मुलाच्या जन्मानंतर बॉलिवूड सिनेमांतून ब्रेक घेतला होता. पण आता तिनं पुन्हा एकदा बॉलिवूडमध्ये परतण्याचा निर्णय घेतला आहे. ‘निकम्मा’मध्ये शिल्पा शेट्टीसोबतच अभिमन्यू दसानी, शिर्ले सेटिया यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात